दांडेगावात इसमाच्या खुनाचा संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:00 IST2020-12-28T05:00:00+5:302020-12-28T05:00:57+5:30

एका ५० ते ५५ वर्षे वयोगटातील इसमाचा मृतदेह राज्यामार्गाच्या कडेलगतच्या जंगलात आढळल्याचे आढळून आले.  मृतकाच्या खिशातील पैसे बाहेर पडले होते. पाच  फुटांवर त्याची पादत्राने आढळून आली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी  केली होती. माञ घटना ऊघडकिस आल्याच्या तब्बल दीड तासानंतर दिघोरी मोठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल  झाल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेविषयी नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.

Suspicion of Isma's murder in Dandegaon | दांडेगावात इसमाच्या खुनाचा संशय

दांडेगावात इसमाच्या खुनाचा संशय

ठळक मुद्देपरिसरात खळबळ : दीड तास ऊशिरा पोहचले पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : साकोली-लाखांदूर या राज्यमार्गावरील दांडेगाव फाट्यानजीकच्या जंगलात राज्यमार्गाच्या कडेलगत एका अनोळखी ५० ते ५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आला. इसमाचा खून करून मृतदेह फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. ही  घटना रविवारी दुपारी उघडकिला आली. या घटनेची माहिती दिघोरी मोठी पोलिसांना देऊनही तब्बल दीड तासानंतर पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी  पोहचल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे.
 एका ५० ते ५५ वर्षे वयोगटातील इसमाचा मृतदेह राज्यामार्गाच्या कडेलगतच्या जंगलात आढळल्याचे आढळून आले.  मृतकाच्या खिशातील पैसे बाहेर पडले होते. पाच  फुटांवर त्याची पादत्राने आढळून आली. या घटनेची माहिती परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी  केली होती. माञ घटना ऊघडकिस आल्याच्या तब्बल दीड तासानंतर दिघोरी मोठी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल  झाल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेविषयी नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
इसमाचा खून करुन मृतदेह रस्त्याच्या कडेला असलेल्या जंगलात फेकण्यात आला असावा, असा  कयास व्यक्त करण्यात आला. 
घटनासबंधाने काही  नागरिकांनी दिघोरी पोलीसांना भ्रमणध्वनीवर माहिती देऊनही चक्क दिड तास ऊशिरा संध्याकाळचे सहा वाजता पोलीस अधिकारी कर्मचारी घटनास्थळी पोहचल्याने ऊलटसुलट चर्चा केली जात होती.  
घटनेची नोंद दिघोरी मोठी पोलीसांनी घेतली असून पुढील तपास दिघोरी मोठीचे सहाय्यक ठाणेदार निलेश गावंडे यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

सालेबर्डीजवळ आढळला तरुणाचा मृतदेह
भंडारा : तालुक्यातील कारधा जवळील सालेबर्डी पुलाजवळ तरुणाचा मृतदेह आढळुन आला. त्याची ओळख पटली नसुन त्याचे वय अंदाजे ३० वर्ष असल्याचे कारधा पोलिसांनी सांगितले. या संदर्भात शालु सिंधीमेश्राम यांच्या रिपोर्टवरुन कारधा पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. सदर तरुणाच्या मृत्युबाबत घातपात तर झाला नसावा अशी शंकाही व्यक्त केली जात आहे. सदर मृत तरुणाचा रंग गोरा असुन उंची पाच फुट सहा इंच आहे. अंगात पांढऱ्या रंगाचा फुलशर्ट व निळ्या रंगाचा जीन्स पॅन्ट घातला आहे. गळ्यात तुळशीची माळ असुन उजव्या हाताला लाल रंगाचा धागा आहे. 

Web Title: Suspicion of Isma's murder in Dandegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून