शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

सर्वेक्षणात आढळले १७२ पॉझिटीव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 5:00 AM

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. सदर पथकांनी जिल्हयातील दोन लाख ८६ हजार १७९ कुटुंबांना भेटी देऊन तपासणी केली. जिल्हयाची एकुण लोकसंख्या १२ लाख २१ हजार ६१६ असून आतापर्यंत ११ लाख ८९ हजार २६९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीची टक्केवारी ९७ टक्के एवढी आहे.

ठळक मुद्देउपक्रम : माझे कुटुंब,माझी जबाबदारी मोहिमेत ११ लाख ८९ हजार नागरिकांचे सर्व्हेक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : प्रभावी कोविड-१९ नियंत्रणासाठी नवीन जीवनशैली पद्धतीचा अवलंब करण्यास अधिकाधिक व्यक्तींना प्रेरीत करण्यासाठी जिल्हयात ह्लमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्व मोहिम प्रभावीपणे राबविली जात असून १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबर या पहिल्या टप्यात ११ लाख ८९ हजार २६९ नागरिकांचे सर्व्हेक्षण पूर्ण झाले आहे. यात एकूण १७२ व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. आता दुसरा टप्पा आजपासून सुरू झाला आहे.माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य पथकांनी घरोघरी जाऊन नागरिकांचे सर्वेक्षण केले आहे. सदर पथकांनी जिल्हयातील दोन लाख ८६ हजार १७९ कुटुंबांना भेटी देऊन तपासणी केली. जिल्हयाची एकुण लोकसंख्या १२ लाख २१ हजार ६१६ असून आतापर्यंत ११ लाख ८९ हजार २६९ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणीची टक्केवारी ९७ टक्के एवढी आहे.या तपासणी मोहिमेत जिल्हयात कोरोना पॉझिटीव्ह १७२ रूग्ण आढळून आले. सारी व आयएलआयच्या ११७२ केसेस तर कोमॉरबिड (सहव्याधी) रूग्णांची संख्या ८४ हजार ७९७ एवढी आढळून आली.आता मोहिमेचा दुसरा टप्पा १४ ऑक्टोंबर पासून सुरू झाला असून तो २४ ऑक्टोंबरपर्यंत चालणार आहे. पथकांचे गृहभेटीचे नियोजन पूर्ण झाले आहे.माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेअंतर्गत आशा कार्याकर्तीव्दारे सर्व्हेक्षणामध्ये घरांना भेटी देतांना लोकांशी संवाद साधुन सदर मोहीमेची सेल्फी काढण्यात येऊन मोहिमे संबंधी व कोविड-१९ संबंधी माहिती कळविण्यात येते.तसेच कोरोनाबाबत जागृती करण्यात येते. लोकप्रतिनिधी, खाजगी रूग्णालय व आशा स्वयंसेविका यांचा या मोहिमेसाठी सहभाग घेतला जात आहे. ह्लमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्व ही मोहिम कोविड-१९ साठी नियंत्रणासाठी अत्यंत महत्वाची आहे. मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली असून जिल्हयात मोहिमेची अंमलबजावणी काटेकोरपणे होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी व्यक्त केला.गृह भेटीचे नियोजन पूर्णमाझे कुटुंब माझी जबाबदारी कोविडमुक्त महाराष्ट्र या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन पुर्ण झाले असून १४ ते २४ ऑक्टोंबर या कालावधीसाठी पथकांच्या गृह भेटीचे नियोजन पुर्ण झाले आहे. मोहिमेचे लक्ष साध्य करणे तसेच मोहिम प्रभाविपणे राबविणे या साठी प्रशासनाने तयारी केली आहे. जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांमार्फत पथकाच्या पर्यवेक्षणाचे नियोजन पुर्ण झाले आहे. दुसरा टप्पा यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी केले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या