सुरांनी गाजली भंडारा आयडल स्पर्धा

By Admin | Updated: November 13, 2015 00:51 IST2015-11-13T00:51:44+5:302015-11-13T00:51:44+5:30

लोकमत सखीमंच, युवानेक्स्ट व बालविकास मंचतर्फे येथील आनंद सभागृहात भंडारा आयडल, मास्टरशेफ व छोटेकुकचे आयोजन करण्यात आले.

Surrey Gajli Bhandara Idol competition | सुरांनी गाजली भंडारा आयडल स्पर्धा

सुरांनी गाजली भंडारा आयडल स्पर्धा


भंडारा : लोकमत सखीमंच, युवानेक्स्ट व बालविकास मंचतर्फे येथील आनंद सभागृहात भंडारा आयडल, मास्टरशेफ व छोटेकुकचे आयोजन करण्यात आले. बालविकास मंच सदस्यांनी प्रदूषण मुक्त दिवाळी या विषयावर पपेट शो करण्यात आले. कार्यक्रमात विजयी स्पर्धकांना मानचिन्ह व भेटवस्तु देवून गौरविण्यात आले.
उद्घाटन संतोष कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळीप्रमुख अतिथी सुदीप शहारे, नितीन धकाते, आशिष खराबे, निशा थोटे, अमित कपूर, विलास शेंडे, प्राचार्य प्रिती धनवलकर, प्राचार्य सुदमा वंजारी आदी उपस्थित होते.
प्रथम आयोजित व्यंजन स्पर्धेत ठराविक नियमाप्रमाणे आरोग्यपूर्ण स्वादिष्ट व आकर्षक सजावट केलेल्या व्यंजनाला परिक्षकांनी प्रत्यक्ष विधी वाचून स्पर्धकांना प्रश्नउत्तर करून व्यंजनांची लज्जत चाखली. मास्टरशेफ स्पर्धेत प्रथम क्रमांकाकरिता अल्का खराबे, द्वितीय आरती रासे तर तृतीय नंदा चेटूले यांची निवड करण्यात आली.
छोटे कुक स्पर्धा वयोगट ५ ते १० मधून प्रथम क्रमांक धिमयी कळंबे, द्वितीय नंदिनी भावसार तर जय सेलोकर यांनी तृतीय क्रमांक पटकाविला. वयोगट ११ ते १५ मधून मैत्री रक्षिये प्रथम, ओजस ढेंगे तर तृतीय क्रमांक वैदेही गिऱ्हेपुंजे यांनी प्राप्त केला. स्पर्धेचे परिक्षण मंगला डहाके व संध्या किरोलिकर यांनी केले. उपस्थित पालक व दर्शकांनी व्यंजनांची लज्जतदार चव घेऊन त्यांची स्तुती केली. भंडारा आयडल स्पर्धेत बालविकास मंच गटातून चेतन कोटांगले प्रथम, श्रिया टांगले द्वितीय, तृतीय क्रमांक कृतिका सुर यांनी पटकाविला. विशेष पारितोषिक वैदेही हाडगेने प्राप्त केला. सखीमंच गटातून प्रथम क्रमांक दिप्ती बोबडे, सुप्रिया रेहपाडे द्वितीय गरिमा वैद्य तृतीय तर विशेष पारितोषिकासाठी रामदुलारी हरदेनिया मानकरी ठरल्या. युवानेक्स्ट गटात निलेश सुर्यवंशी प्रथम, सोनाली मानकर द्वितीय, डेव्हीड भालाधरे तृतीय व विशेष पुरस्काराचा मानकरी गगन बिसेन ठरला. परिक्षण स्मिता गालगाडे, राहुल हुमणे व पराग डहाके यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा संयोजक ललित घाटबांधे व आभार जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार यांनी मानले. कार्यक्रमात सुदीप कम्प्युटर्स व कॅफे रेड रोज रेसिडन्सी, ओम साई रेस्टारंट, एन्जल ब्रोळींग यांचे सौजन्य लाभले. सुहासीनी अल्लडवार, राखी सूर, मनिषा रक्षिये, किरण भावसागर, स्रेहा वरकडे, लतीषा खोत, धनू खोत, श्री खोत व शशांक रामप्रसाद यांनी सहकार्य केले.(मंच प्रतिनिधी)

Web Title: Surrey Gajli Bhandara Idol competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.