रॉकेल व धान्य पुरवठा करा
By Admin | Updated: February 4, 2015 23:09 IST2015-02-04T23:09:59+5:302015-02-04T23:09:59+5:30
रॉकेलचा कोटा पुर्ववत सुरु करून केसरी कार्ड (एपीएल) धारकांना धान्य पुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत मंगळवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

रॉकेल व धान्य पुरवठा करा
कोट्यात ७२ टक्के कपात : राकाँंचे तहसीलदारांना निवेदन
पवनी : रॉकेलचा कोटा पुर्ववत सुरु करून केसरी कार्ड (एपीएल) धारकांना धान्य पुरवठा पूर्ववत सुरु करण्याबाबत मंगळवारी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदन पवनी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राज्य शासनाला पाठविण्यात येणार आहे.
केंद्रात व राज्यात भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर रॉकेल कोट्यात ७२ टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे राज्याला केवळ २८ टक्के म्हणजे ४९००० लिटर रॉकेल मिळत आहे. तर पवनी तालुक्याला २४० लिटर रॉकेल पुरवठा लागत असताना फक्त ३८ कि.ली. रॉकेल मिळत असल्याने ग्रामीण भागातील जनतेला स्वंपाकासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे.
तसेच केशरी कार्ड (एपीएल) धारकांना आघाडी सरकारने सुरु केलेल्या योजना पूर्ववत करण्यात याव्यात व गरजू लाभार्थ्यांना बंद केलेल्या अन्नधान्य पुरवठा तात्काळ सुरु करण्याबाबत तहसिलदारामार्फत निवेदन सादर करण्यात आले. तात्काळ योजना पूर्ववत न केल्यास राकॉतर्फे जनआंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. शिष्टमंडळात जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष विलास काटेखाये, जिल्हा परिषद सदस्य राजेश डोंगरे, तालुकाध्यक्ष लोमेश वैद्य, शैलेश मयूर, सुनंदा मुंडले, शहर अध्यक्ष डॉ. विजय ठक्कर, उपसभापती रमेश ब्राह्मणकर, सामृतवार, यादव भोगे, दिनेश गजभिये, किसन भानारकर, उज्वल धारगावे, नानाजी बावनकर, रामू मुंडले, द्रोपद भानारकर, यादव मेंढे, राजु गजभे, शरद काटेखाये, डॉ. विक्रम राखडे, धनराज पंचभाई, अरुण मुंडले, छोटु बाळबुध्दे, मनोज कोवासे, प्रमोद डोये, अनिल बन्सोड आदी यावेळी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)