दूषित पाण्याचा पुरवठा सुरुच
By Admin | Updated: November 14, 2016 00:31 IST2016-11-14T00:31:10+5:302016-11-14T00:31:10+5:30
मागील आठ दिवसांपासुन भंडारा शहरातील बहुतांश वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुषित व अल्प पुरवठा होत आहे.

दूषित पाण्याचा पुरवठा सुरुच
आरोग्य धोक्यात : प्रस्ताव अधांतरी
भंडारा : मागील आठ दिवसांपासुन भंडारा शहरातील बहुतांश वॉर्डामध्ये पिण्याच्या पाण्याचा दुषित व अल्प पुरवठा होत आहे. पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर असताना या मुलभूत समस्येकडे लक्ष दयायला वेळ नसल्याने नागरिकांवर दुषीत पाणी पिण्याची वेळ आली आहे.
नगर परिषद नियमानुसार प्रशासनाने शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे बंधनकारक आहे. परंतु या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही. भंडारा शहरातील बहुतांश वॉर्डांमध्ये दुषित व अल्प पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांना पिण्याचे शुध्द व स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देणे नगर परिषदेची जबाबदारी असतानाही याकडे कानाडोळा केला जात आहे.
विशेषत: मोठा बाजार परिसर खात रोड परिसरातील वैशाली नगर शिवनगरी, तुलसीनगर, राणी लक्ष्मीबाई वॉर्ड, चांदणी चौक परिसर, राममंदिर वॉर्ड पिण्याचा पाण्याचा दुषित व अल्प पाणी पुरवठा होत आहे. काही ठिकाणी १० मिनीट पाणी येत असल्याने पाण्यासाठी नागरिकांची पायपीट होत आहे. वैनगंगा नदीत मुबलक जलसाठा असतांनाही शुध्द पाणीपुरवठा योजना आजही अधांतरी आहे. (प्रतिनिधी)