अंधश्रध्दा निर्मूलन प्रबोधन शिबिर

By Admin | Updated: January 27, 2015 23:28 IST2015-01-27T23:28:46+5:302015-01-27T23:28:46+5:30

नजिकच्या कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह यात्रेच्या ठिकाणी अंधश्रध्दा निर्मुलन समिती व राज्य सरकारी कर्मचारी संघटना शाखा साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रध्दा निर्मुलन व जादुटोणा

Superstition Elimination Prabodhan Camp | अंधश्रध्दा निर्मूलन प्रबोधन शिबिर

अंधश्रध्दा निर्मूलन प्रबोधन शिबिर

साकोली : नजिकच्या कुंभली यात्रेतील दुर्गाबाईचा डोह यात्रेच्या ठिकाणी अंधश्रध्दा निर्मुलन समिती व राज्य सरकारी कर्मचारी संघटना शाखा साकोली यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रध्दा निर्मुलन व जादुटोणा विरोधी कायदा व वैद्यानिक दृष्टीकोण या विषयावर तंज्ञाचा मार्गदार्शन व प्रात्यक्षिके घेण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक अ.भा. अंनिसचे विदर्भ संघटक हरिभाऊ पातोडे यांचे हस्ते तर अध्यक्षस्थानी भंडारा जिल्हा संघटक वसंत लाखे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रकाश धोटे, अध्यक्ष एस. एस. चव्हाण, मदन बांडेबुचे, मुलचंद कुकडे, राम येवले, प्रा. अशोक गायधने, डी. जी. रंगारी, ठाणेदार भगवान खारतोडे, विमल हुकरे, रमेश गाटेफोडे, घनश्याम राऊत, अ. शी. रंगारी उपस्थित होते.
कार्यक्रमात डॉ. प्रकाश थोटे, एस. एस. चव्हाण, डी.जी. रंगारी, मदन बांडेबुचे, मुलचंद कुकडे, प्रा. प्रोफेसर बहोकर, बी. एल. मेश्राम, वसंत लाखे, अशोक गायधने इत्यादी मान्यवरांनी प्रात्यक्षिकातून प्रबोधन केले. के. एस. रंगारी यांनी अंधश्रध्दा निर्मुलनावर आधारित अनेक गीत सादर केले. याशिवाय जादुटोणा, भूत, भानामती, तंत्रमंत्र, देवी अंगात येणे हे सिध्द करणाऱ्यास २१ लाखांचे बक्षीस देण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु हे आवाहन एकाही देविने स्विकारले नाहीत. तसेच यात्रेत जादुटोणा विरोधी कायदयाचे पत्रक वाटण्यात आले.
डी. जी. रंगारी यांनी तांत्रिक-मांत्रिक-बुबा-बाबा कशी जनतेची लुबाडणूक व फसवणूक करतात हे प्रयोगाच्या माध्यमातून प्रबोधन केले. कार्यक्रमाचे संचालन बी. एल. मेश्राम यांनी केले तर आभार यशवंत उपरीकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता डॉ. आयोजक डी. जी. रंगारी, यशवंत उपरीकर, बी. एल. मेश्राम, टेकराम वलथरे, भारती रंगारी, नरेश रामटेके, आशा वासनिक, बी. डी. धारगावे, उंदिरवाडे, भिमराव मोटघरे, नामदेव कान्हे्रर, राजू बन्सोड, पी.एल. वैद्य, के. एस. रंगारी व भंडारा व गोंदिया जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Superstition Elimination Prabodhan Camp