सनफ्लॅग कामगारांचा संपाचा तिढा सुटण्याची आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:35 IST2021-03-26T04:35:37+5:302021-03-26T04:35:37+5:30

वरठी येथील सनफ्लॅग कंपनी आघाडीची आणि सर्वाधिक नफा कमावणारी आहे. या कंपनीत सुमारे ३७५ आणि दोन हजार कंत्राटी कामगार ...

Sunflag workers' hopes of escaping the strike are dashed | सनफ्लॅग कामगारांचा संपाचा तिढा सुटण्याची आशा पल्लवित

सनफ्लॅग कामगारांचा संपाचा तिढा सुटण्याची आशा पल्लवित

वरठी येथील सनफ्लॅग कंपनी आघाडीची आणि सर्वाधिक नफा कमावणारी आहे. या कंपनीत सुमारे ३७५ आणि दोन हजार कंत्राटी कामगार आहे. कोरोनाच्या काळातील काही काळ सोडल्यास वर्षभर ही कंपनी सुरू होती. परंतु कामगारांना हक्काच्या वेतनापासून वंचित ठेवले जात आहे. आपल्या मागण्यांसाठी वारंवार निवेदने देऊनही स्थानिक व्यवस्थापन अडवणूक करीत आहे. या सर्व प्रकाराला त्रासून कामगार संघटनांनी १३ मार्चपासून बेमुदत संप पुकारला. सुरुवातीला खासदार सुनील मेंढे यांनी व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्या चर्चा घडवून आणली. परंतु स्थानिक व्यवस्थापन उदासीन दिसले. व्यवस्थापन अधिकारी रामचंद्र दळवी यांनी थेट कंपनी बंद करण्याची भाषा वापरली. यावर खासदार मेंढे यांनी चांगलाच समाचार घेतला.

स्थानिक अधिकारी ऐकत नसल्याने खासदार मेंढे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. त्यावरून ना. गडकरी यांनी सरफ्लॅग कंपनीचे मालक प्रणव भारद्वाज यांना तात्काळ बोलावून चर्चा घडवून आणली. या बैठकीत खासदार मेंढे यांनी कामगारांचे प्रतिनिधित्व केले. या चर्चेत संपाचा तिढा सोडविण्यावर निर्णय घेण्यात आला.

बॉक्स

कंपनीला हायजॅक करण्याचा घाट

सरफ्लॅग व्यवस्थापनाचे स्थानिक सूत्रधार एस.के. गुप्ता आहेत. ते मनमानी धोरणासाठी प्रसिद्ध आहेत. कामगार व अधिकाऱ्यांना दमदाटी करणे, चिथावणी देणे यात त्यांचा हातखंडा आहे. सनफ्लॅग कामगारांनी पुकारलेला संपही त्यांचा स्वभावाचा परिणाम आहे. स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून त्यांनी संप घडवून आणल्याची चर्चा आहे. कंपनीला डबघाईस आणून त्यावर मालकी गाजविण्याची तयारी आहे. एकप्रकारे कंपनीला हायजॅक करण्याचे घाटत असल्याचे बोलले जात आहे.

बॉक्स

दोन दिवसात होणार बैठक

कामगारांच्या संपाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. कामगारांच्या मागण्यांबाबत मालकाला जाणूनबुजून अनभिज्ञ ठेवण्यात आले होते. खासदार मेंढे यांनी हा सर्व प्रकार भारद्वाज यांच्या लक्षात आणून दिला. त्यामुळे लवकरच तोडगा निघण्याचे संकेत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत दोन दिवसात बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Sunflag workers' hopes of escaping the strike are dashed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.