शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण: सरकारचा मसुदा तयार; लवकरच निर्णय; मुख्यमंत्री अन् उपसमितीची संयुक्त बैठक
2
दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे SCO मध्ये पाकिस्तानला खडेबोल
3
जम्मू काश्मीर: पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला !
4
अफगाणिस्तानच्या पूर्व भागात रात्री ६ रिक्टर स्केल क्षमतेचा तीव्र भूकंप; ८०० लोकांचा मृत्यू
5
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

सुंदरकांड चळवळीला सहा वर्षे पूर्ण

By admin | Updated: August 14, 2014 23:34 IST

सर्व जातीधर्म, गरीब, श्रीमंत यांच्या सीमा ओलांडून एकत्रित आलेल्या २१ महिला भाविक कुटुंबियांसोवत मागील सहा वर्षांपासून येथील हनुमंतांच्या देवस्थानात सुंदरकांडाचे पठण करीत आहेत.

अड्याळ : सर्व जातीधर्म, गरीब, श्रीमंत यांच्या सीमा ओलांडून एकत्रित आलेल्या २१ महिला भाविक कुटुंबियांसोवत मागील सहा वर्षांपासून येथील हनुमंतांच्या देवस्थानात सुंदरकांडाचे पठण करीत आहेत. दि. ५ आॅगस्ट २००९ ला हरिओम सुंदरकांड महिला भजन मंडळाची स्थापना केली. या स्थानिक सुंदरकांड उपक्रमाला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. सामाजिक समरसतेच्या भावनेतून बचतगट, व विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून अनेक महिलांना एकत्रित आणून सामाजिक, धार्मिक दायीत्व पार पाडत आहेत.पवनी तालुक्यातील श्री हनुमंताचे तीर्थक्षेत्र असलेल्या अड्याळ गावामध्ये गत सहा वर्षांपासून या महिलांनी एकत्रित येऊन श्री हनुमान मंदिर येथे दर मंगळवारी व शनिवारी संगीतमय सुंदरकांड गायन करतात. कुणी गरीब कुटुंबातील या महिला सुंदरकांड गायनाला जातात. या सुंदरकांड भजन मंडळातील संपूर्ण महिलांनी एकत्रित येऊन बचत गटाची स्थापनाही केली आहे. मंदिरातील प्रत्येक कार्यक्रमात यांचा दुसऱ्याचे जीवन अर्थपूर्ण बनविते. सामाजिक बांधीलकीतून एकमेकांच्या गरजा पुरविणे, कर्तृत्वाचा धनी कोणी झाला तर अवडंबर न माजविता त्याचा गौरव करणे, आरतीचे पैसे समाजोपयोगी कामात खर्च करणे आदी समाजोपयोगी उपक्रम या महिला करीत आहेत. सहा वर्षामध्ये ३१२ सुंदरकांड गायन पूर्ण करण्यात आलेले आहे. या महिलांना हनुमान देवस्थान कमेटीतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या अखंड ज्योतिकलश, नवरात्रोत्सवादरम्यान साडी-चोळी भेट देण्यात येते, असे मंदिर समितीचे अध्यक्ष भास्करराव पोटवार यांनी सांगितले. सहा वर्षे उपक्रम कधी न चुकता वेळेचे बंधन तंतोतंत पाळत आहेत.या उपक्रमात रेणुका चांडक, नीता भोयर, नीता जोशी, शुभांगी श्रृंगारपवार, मोहिनी पेशने, सरीता चांडक, प्रिती सलुजा, विभा वसानी, निलू टावरी, माधुरी चांडक, वंदना पवार, सुशिला दलाल, मालु ब्राम्हणकर, कैलास मदान, वंदना टेप्पलवार, हेमा मदान, अर्चना उपाध्यक्ष आदींचा समावेश आहे. (वार्ताहर)