सुमो उलटली, पाच जण गंभीर जखमी
By Admin | Updated: April 5, 2017 00:17 IST2017-04-05T00:17:50+5:302017-04-05T00:17:50+5:30
भरधाव सुमो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटून वाहनातील पाच जण गंभीर जखमी झाले.

सुमो उलटली, पाच जण गंभीर जखमी
तुमसर : भरधाव सुमो अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटून वाहनातील पाच जण गंभीर जखमी झाले. यात दोन लहान मुली व तीन महिलांचा वाहनातील पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात देव्हाडी शिवारात सकाळच्या सुमारास घडला. रूग्णवाहिका न आल्याने पोलीस व्हॅनने जखमींना रूग्णालयात नेण्यात आले.
एकोडी (गोंदिया) येथून नागपूर येथे परमात्मा सेवक मंडळाच्या कार्यक्रमाला वाहन क्रमांक सीजी ०७ - ५१८७ देव्हाडी शिवारात वळणावर अनियंत्रीत झाल्याने उलटली. त्यानंतर एकच जखमींचा आरडाओरड सुरु होती. त्यावेळी तिथून जाणारे पत्रकार महेश गायधने, मोहन भोयर, पवन बालपांडे, प्रा.संजय बुराडे, संतोष पाठक यांना उलटलेले वाहन दिसले.
जखमी महिला व दोन लहान मुलींना सुमोचा काच फोडून बाहेर काढले. दरम्यान अपघाताची माहिती तुमसर पोलीस तथा रुग्णवाहिकेला देण्यात आली. अवघ्या दहा मिनिटात तुमसर पोलिसांच्या तीन गाड्या अपघातस्थळी दाखल झाल्या. काही जखमींना एका प्रवाशी गाडीने तर उर्वरीतांना तुमसर पोलीस गाडीने रुग्णालयात हलविण्यात आले. यातील दोन लहान मुलींचे व महिलांचे हात मोडले होते. जखमींच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. पाच जणांची प्रकृती चिंताजनक असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना भंडारा येथे हलविण्यात आले. जखमीबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. (तालुका प्रतिनिधी)