शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

गोदामाअभावी उन्हाळी धान खरेदी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

लाखनी खरेदी केंद्रावर बाजार समिती परिसरात १०३ शेतकऱ्यांचे ४०६७ क्विंटल धान खरेदी झाली तर गडेगाव येथील गोदामात ५५ श्ेतकऱ्यांचे २१९७ क्विंटल धान खरेदी झालेली आहे. लाखनी केंद्रावर तीन ठिकाणी धान मोजणी सुरु आहे. सालेभाटा येथील विविध कार्यकारी संस्थेच्या गोदामात ४८ श्ेतकºयांचे १३२३ क्विंटल धान खरेदी केले तर राजेगाव येथे ३८ शेतकऱ्यांचे ८५३ क्विंटल धान खरेदी केला आहे.

ठळक मुद्देदहा दिवसात १३ हजार क्विंटल धान खरेदी : लाखो क्विंटल धान खरेदी केंद्राबाहेर पडून, पावसाने धानपोती भिजली

चंदन मोटघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : स्थानिक साकोली तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीद्वारे रब्बी आधारभूत धान खरेदी २२ मे पासून विविध केंद्रावर करण्यात आले. खरेदी विक्रीद्वारे १० दिवसात १३ हजार ४६७ क्विंटल उन्हाळी धान खरेदी करण्यात आला आहे. लाखनी येथील बजाार समितीच्या परिसरात १० हजार क्विंटल धान मोजणीच्या प्रतीक्षेत आहे. तर खरीप धानाची उचल झालेली नसल्याने गोदाम भरलेले असल्यामुळे अनेक ठिकाणी धान खरेदी सुरु झालेली नाही.लाखनी खरेदी केंद्रावर बाजार समिती परिसरात १०३ शेतकऱ्यांचे ४०६७ क्विंटल धान खरेदी झाली तर गडेगाव येथील गोदामात ५५ श्ेतकऱ्यांचे २१९७ क्विंटल धान खरेदी झालेली आहे. लाखनी केंद्रावर तीन ठिकाणी धान मोजणी सुरु आहे. सालेभाटा येथील विविध कार्यकारी संस्थेच्या गोदामात ४८ श्ेतकºयांचे १३२३ क्विंटल धान खरेदी केले तर राजेगाव येथे ३८ शेतकऱ्यांचे ८५३ क्विंटल धान खरेदी केला आहे. एकोडी येथे विविध कार्यकारी संस्थेच्या गोदामात १२०२ क्विंटल व चांदोरीच्या केंद्रावर २४४ क्विंटल धान खरेदी करण्यात आला आहे.तालुक्यातील जेवनाळा केंद्राअंतर्गत कनेरी येथील सोसायटीच्या गोदामात ९६७ क्विंटल धान गुरठा येथे १५२१ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. परसोडी केंद्राअंतर्गत उमरी येथील भास्कर कापगते यांच्या गोदामात ३८ शेतकºयांचे १०९२ क्विंटल धान खरेदी करण्यात आले आहे. उन्हाळी धान शेतकऱ्यांनी मोजणीसाठी खरेदी केंद्राबाहेर ठेवला आहे. शेतकºयांना टोकन देण्यात येत आहे.खरीप धानाची विक्रमी खरेदीखरीप धान खरेदी दि. ३० एप्रिलपर्यंत सुरु होती. सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीद्वारे लाखनी, सालेभाटा, एकोडी, जेवनाळा, परसोडी, सातलवाडा या धान खरेदी केंद्रावर २ लाख ४४ हजार ३१७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली. लॉकडाऊनमध्ये शासनाने एक महिन्याची मुदतवाढ दिली होती. खरेदी विक्रीद्वारे ४४ कोटी ४३ लाख ३६६ हजार रुपयांची धान खरेदी केली. बºयाच शेतकºयांना जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाद्वारे पैसे देण्यात आले आहे. संपूर्ण जिल्ह्यात ५३ कोटी रुपयाचे वाटप करण्यात आले. उर्वरीत शेतकºयांना दोन दिवसात पैसे देण्यात येणार असल्याचे मार्केटिंग अधिकारी खाडे यांनी सांगितले आहे. खरेदी विक्री सहकारी संस्था ही धान खरेदी करण्यात राज्यात दुसºया क्रमांकाची संस्था आहे.धानाची उचल नाहीलाखनी खरेदी विक्री सहकारी संस्थेअंतर्गत येणाºया सातलवाडा, परसोडी, बोरगाव, पिंडकेपार, गोंडसावरी येथील गोदाम खरीप धानाने भरलेली आहेत. धानाची उचल झालेली नसल्याने उन्हाळी धान, खरेदी बंद आहे. शेतकºयांनी गोदामासमोर माल आणून ठेवला आहे. लाखनीचे खरेदी विक्रीचे गोदाम भरलेले आहे.गोदामाअभावी धान खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात नाही. लाखनी केंद्रावर बाजार समितीद्वारे शेतकºयांना टोकन दिले जात आहे. त्यानुसार दोन काट्यावर धान मोजणी होत आहे. रब्बी उन्हाळी धानाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. खरीप धानाची खरेदी ३० एप्रिलपर्यंत सुरु होती. वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून प्रश्न सोडविण्यात येणार आहैे.-घनश्याम पाटील खेडीकर, सभापती, सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्था

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड