उन्हाळी धानाचे पीक घरातच, कर्ज फेडायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST2021-06-22T04:24:17+5:302021-06-22T04:24:17+5:30

लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात उन्हाळी धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या परिसरात अल्पभूधारक शेतकरी असून शेतीचा लागत खर्च ...

Summer grain crop at home, how to repay the loan? | उन्हाळी धानाचे पीक घरातच, कर्ज फेडायचे कसे?

उन्हाळी धानाचे पीक घरातच, कर्ज फेडायचे कसे?

लाखांदूर तालुक्यातील बारव्हा परिसरात उन्हाळी धान पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या परिसरात अल्पभूधारक शेतकरी असून शेतीचा लागत खर्च निघत नसतानाही मजुरीसह दुधाळू पाळीव जनावरे पालन पोषण करून शेती करीत आहेत. डोक्यावर कर्जाचे गाठोडे घेऊन जास्त नाही पण उत्पादन खर्च तरी निघेल, या आशेवर यावर्षी उन्हाळी धानाचे पीक घेतले. उत्पादन होऊनही सरकारी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरू केली नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

काही शेतकऱ्यांनी धान मातीमोल भावाने विकले तर काहींनी आज ना उद्या शासन आधारभूत केंद्रावर धान खरेदी करेल, या आशेवर घरीच धान ठेवले आहे. मात्र आता हंगामात शेतकऱ्यांना पैसे हवे आहेत. कर्ज कसे फेडायचे हाही प्रश्न आहे.

बॉक्स

लाखांदूर तालुक्यातील पारडी येथील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर बारदाना अभावी धान खरेदी बंद आहे. तसेच पोत्याचे वजन पकडून ४१ किलो मोजणे आवश्यक आहे, मात्र तसे न करता ४३ किलो धान मोजले जाते म्हणजे प्रती पोत्यामागे दोन किलो अधिक धान मोजले जात आहे. एक प्रकारची शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. मात्र या प्रकाराकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.

Web Title: Summer grain crop at home, how to repay the loan?