खेड्यातल्या सुमितची गगनभरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:12 IST2018-09-14T23:12:00+5:302018-09-14T23:12:19+5:30

ज्या गुणामुळे मनुष्य गगनाला गवसनी घालू शकतो, ते गुण प्रत्येकाकडेच असतातच. परंतु त्या गुणाचा विकास कसा करायचा हे तुमसर तालुक्यातील बिनाखी या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या सुमित चंद्रशेखर गणवीर याने त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांतून सिध्द करुन दाखविले आहे. तो मल्हार फिल्म प्रॉडक्शन निर्मित वैराट या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

Sumit's Gaganbharari in the village | खेड्यातल्या सुमितची गगनभरारी

खेड्यातल्या सुमितची गगनभरारी

ठळक मुद्देचित्रपटातून झळकणार रुपेरी पडद्यावर : मुंबईतून घेतले अभिनयाचे धडे

राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ज्या गुणामुळे मनुष्य गगनाला गवसनी घालू शकतो, ते गुण प्रत्येकाकडेच असतातच. परंतु त्या गुणाचा विकास कसा करायचा हे तुमसर तालुक्यातील बिनाखी या छोट्याशा खेडेगावात जन्मलेल्या सुमित चंद्रशेखर गणवीर याने त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांतून सिध्द करुन दाखविले आहे. तो मल्हार फिल्म प्रॉडक्शन निर्मित वैराट या मराठी चित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
सुमित चंद्रशेखर गणवीर रा. बिनाखी असे त्यांचे नाव आहे. बालपणी प्राथमिक शिक्षण बिनाखी येथील जि.प. शाळेत तर माध्यमिक शाळेचे शिक्षण सिहोरा येथे झाले. नानाजी जोशी कॉलेज शहापूर येथून पदवी घेतलेल्या सुमितला अगदी बालवया पासूनच टिव्ही पाहण्याची सवय जडली होती. अपाणही टीव्हीमध्ये काम करू, अशी इच्छा तो आपल्या पालकांकडे नेहमी व्यक्त करायचा.
परंतु घरात आई, वडील व नातेवाईकांपैकी कुणालाही अभिनयाचा गंध नसल्यामुळे तसेच खेड्यापड्यात नाटकालाही वाव नसल्यामुळे तो चित्रपट क्षेत्रात जाईल, असे त्याच्या कुटुंबीयांना कधी वाटले नव्हते.
मात्र त्याला चित्रपट क्षेत्रात जाण्याची आवड शांत बसू देत नव्हती. त्यामुळे ग्रॅज्युऐशनचे शिक्षण तुमसर येथे पूर्ण करुन त्याने थेट मुंबई गाठली.सतत धावणारी मुंबई पाहून त्याने मुंबईत करियर करण्याचा विचार केला व त्याने मुंबईतल्या अ‍ॅक्टिंग अकॅडमीत अ‍ॅक्टिंगचे धडे घेतले.
मनात जिद्द व चिकाटीने पूर्ण वेळ मेहनत करुन अ‍ॅक्टिंग व डॉन्सींगमध्ये पारंगत झाला व त्यातच त्याला संदिप आहेर दिग्दर्शित मल्हार फिल्म प्रॉडक्शनच्या वैराट या मराठी चित्रपटात संधी मिळाली असून या चित्रपटाच्या चित्रीकराणाला ५ मार्च पासून प्रारंभ झाला असून अहमदनगर शहरात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे.
या शिवाय सोलापूर शिरुर व कर्नाटक राज्यातही या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सुमितने दिली.
वैराट चित्रपटात कथा ही प्रामाणिक प्रेमावर आधारित आहे. महाराष्टÑाच्या सर्व सिनेमारसिकांना हा चित्रपट व आपली भूमिका नक्की आवडेल असा आशावादही सुमितने बोलून दाखविला आहे.

Web Title: Sumit's Gaganbharari in the village