मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
By Admin | Updated: January 25, 2016 00:39 IST2016-01-25T00:39:45+5:302016-01-25T00:39:45+5:30
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनाची नगर पालिका प्रशासनाने निमंत्रण पत्रिका छापली. यात तिरंगा उलटा छापण्यात आला.

मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
प्रकरण राष्ट्रध्वज उलट छपाईचे : तुमसर पोलिसांना निवेदन
तुमसर : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या वर्धापन दिनाची नगर पालिका प्रशासनाने निमंत्रण पत्रिका छापली. यात तिरंगा उलटा छापण्यात आला. याप्रकरणी भाजयुमोचा निवेदनावरुन तुमसर पोलिसांनी मुख्याधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
तुमसर नगरपालिकेच्यावतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त नागरिकांना निमंत्रण देण्यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. या पत्रिकेवर राष्ट्रध्वज उलटा छापण्यात आला. ही चुक लक्षात येताच मुख्याधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून वाटप केलेल्या पत्रिका परत घेवून माफी मागितली. शनिवारी राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री अमित चौधरी, विजय जयस्वाल, अर्पित जयस्वाल यांनी ठाणेदार गवई यांना निवेदन देवून मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. याप्रकरणी कलम २ राष्ट्रीय मानचिन्ह अवमानना प्रतिबंध कायदा १९७१ अंतर्गत मुख्यधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)