दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
By Admin | Updated: March 31, 2015 00:45 IST2015-03-31T00:45:17+5:302015-03-31T00:45:17+5:30
सिंडिकेट कॅम्प येथे एक २० वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. किसान धनंजय रा. सिंडिकेट कॅम्प,

दोघांची गळफास घेऊन आत्महत्या
तुमसर : सिंडिकेट कॅम्प येथे एक २० वर्षीय युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. किसान धनंजय रा. सिंडिकेट कॅम्प, डोंगरी बु. असे मृतकाचे नाव आहे. सोमवार दूपारी २ वाजताच्या सुमारास त्याचे प्रेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.
सिंडिकेट कॅम्प रेल्वे ट्रॅकजवळील एका करंजीच्या झाडाला त्याचा मृतदेह नागरीकांना दिसला. ग्रामस्थांनी गोबरवाही पोलिसांना माहिती दिली. मृतक किसन धनंजय यांचे वडील स्थानिक मॉईलमध्ये कर्मचारी आहेत. मॉईल प्रशासनाने या आत्महत्या प्रकरणाची तक्रार गोबरवाही पोलिस ठाण्यात नोंदविली. किसन हा खाणीत प्रशिक्षणार्थी होता अशी माहिती आहे. तपास पोलिस हवालदार कुंभलवार करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
तरुणीची आत्महत्या
सिहोरा : पोलिस स्टेशन सिहोरा अंतर्गत येत असलेल्या गोंदेखारी (चुल्हाड) येथील पल्लवी चंदुलाल शरणांगत (१७) हिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. पल्लवी ही ११ वीची विद्यार्थिनी असून आत्महत्येच्या वेळी ती एकटीच घरी होती.