जिद्दीच्या बळावर खेचून आणले यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:12 IST2018-02-20T00:12:05+5:302018-02-20T00:12:19+5:30
मनात जिद्द असली की कुठलीही बाब अशक्य नाही. अशावेळी फक्त मेहनत व प्रयत्नावर यशाची भिस्त अवलंबून असते. असेच प्रेरणादायी यश एका १४ वर्षीय खेळाडू असलेल्या संचारी सुनिल भोवते हिने खेचून आणले आहे.

जिद्दीच्या बळावर खेचून आणले यश
इंद्रपाल कटकवार ।
आॅनलाईन लोकमत
भंडारा : मनात जिद्द असली की कुठलीही बाब अशक्य नाही. अशावेळी फक्त मेहनत व प्रयत्नावर यशाची भिस्त अवलंबून असते. असेच प्रेरणादायी यश एका १४ वर्षीय खेळाडू असलेल्या संचारी सुनिल भोवते हिने खेचून आणले आहे.
संचारी ही भंडारा (उमरी) येथील महर्षी विद्या मंदिर शाळेची इयत्ता नववीची विद्यार्थीनी असून तिने नुकतेच दिल्ली येथे झालेल्या ‘खेलो इंडिया खेलो’ या स्पर्धेअंतर्गत व्हॉली बॉल स्पर्धेत रजत पदक प्राप्त केले आहे. व्हॉली बॉल व धावण्याच्या स्पर्धेत सातत्याने भाग घेणारी संचारी ही अभ्यासामध्येही तेवढीच हुशार आहे. विज्ञान, गणीत, हिंदी, संगणक, सामाजिक शास्त्र आदी विषय शिकत असलेल्या संचारीला खेळण्याची सवय बालपणापासूनच. आई संध्या भोवते या क्रीडा शिक्षक असल्याने क्रिडांगणातील विविध खेळांचे बाळकडू सातत्याने मिळत राहिले. इयत्ता पाचवी पासून व्हॉलीबॉल खेळत असलेल्या संचारीने खेलो इंडिया खेलो या स्पर्धेसाठी अहोरात्र मेहनत घेतली. तालुका, जिल्हास्तरीय विभागीय स्तरीय व त्यानंतर राज्यस्तरावर सहभाग घेवून दिल्ली येथे होणाºया राष्टÑीय स्पर्धेसाठी दमदार एन्ट्री मारली. शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जावा असे उत्कृष्ट खेळ सादर करुन संचारीने रजत पदकाचा मान मिळविला. अव्वल स्थान प्राप्त करता आले नाही अशी खंतही तीने व्यक्त केली असली तरी भविष्यात अव्वल येण्याचा आपला मानस असल्याचेही तिने प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.
तिच्या या यशामागे शाळेच्या प्राचार्य श्रृती ओहळे, क्रीडा शिक्षक तथा मार्गदर्शक एन.एस. उईके व आई-वडीलांचा मोलाचा वाटा आहे. संचारीचे वडील पोलीस विभागात कार्यरत असून तिचा मोठा भाऊ बीबीए अंत्य वर्षात शिक्षण घेत आहे. चार्टेड अकांउटंट किंवा खेळाच्या माध्यमातून भविष्यात रेल्वेत किंवा सिव्हील एव्हीएशनमध्ये कार्य करण्याची तिची ईच्छा आहे.