लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी आरक्षणाने रद्द झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या गट-गणांची महिला आरक्षण सोडत गुरुवारी काढण्यात आली. या सोडतीत महिला - पुरुष गटात अदलाबदल झाली आहे. सहा गटांमध्ये बदल झाला असला तरी पूर्वीचे नामाप्र तीन गट आता सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले. त्यामुळे येथे इच्छूक असलेल्या पुरुष उमेदवारांची पंचायत झाली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले. त्यामुळे ५२ पैकी १३ नामाप्र गटातील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यानंतर या १३ ही जागा सर्वसाधारण करुन निवडणुकीची घोषणा करण्यात आली. १८ जानेवारी रोजी या १३ गटांसाठी निवडणूक होत आहे. त्या गटातील महिला आरक्षणाची सोडत गुरुवारी भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात आली. १३ पैकी ७ महिलांसाठी ६ गट आरक्षित झाले आहेत.तुमसर तालुक्यातील चुल्हाड हा पूर्वी नामाप्र स्त्री साठी राखीव होता. तो आता सर्वसाधारण झाला आहे. सिहोरा नामाप्र स्त्री असलेला गट सर्वसाधारण स्त्री झाला आहे. तर गर्रा हा नामाप्र स्त्री असलेला सर्वसाधारण झाला आहे. मोहाडी तालुक्यातील कांद्री हा नामाप्र असलेला गट आता सर्वसाधारण स्त्री साठी राखीव झाला आहे. यामुळे येथे निवडणूक रिंगणात असलेल्या पुरुषांना माघार घ्यावी लागणार आहे. डोंगरगाव हा गट सर्वसाधारण झाला असून वरठी हा नामाप्र स्त्री असलेला गट सर्वसाधारण झाला आहे. लाखोरी नामाप्र सर्वसाधारण स्त्री झाल्याने येथेही पुरुष उमेदवारांची पंचायत होत आहे. तर मुरमाडी (सा) आणि केसलवाडा (वाघ) हे दोन गट नामाप्र स्त्री गट होते. ते आता सर्वसाधारण स्त्री झाले आहेत. मुरमाडी (तुप) हा सर्वसाधारण गट आहे. भंडारा तालुक्यातील सिल्ली हा पुर्वी नामाप्र स्त्री असलेला सर्वसाधारण स्त्री झाला आहे. तर पवनी तालुक्यातील ब्रम्ही हा नामाप्र गट सर्वसाधारण झाला आहे. भुयार हा नामाप्र गट आता स्त्री सर्वसाधारण राखीव झाला. यासोबतच पंचायत समितीच्या गणांचीही महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. अनेक ठिकाणी बदल झाले आहेत. भंडारा पंचायत समितीच्या महिला आरक्षण सोडतीची माहिती प्रशासनाकडून उपलब्ध झाली नव्हती.
कांद्री, लाखोरी आणि भुयारमध्ये अनेकांची अडचण- नागरिकांचा मागास प्रवर्ग रद्द झाल्याने सर्वसाधारण प्रवर्गातून होणाऱ्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. मात्र तीन गटात पुरुष उमेदवारांची चांगलीच पंचायत झाली आहे. पुर्वी कांद्री, लाखोरी आणि भुयार नामाप्र होते. परंतु आता सर्वसाधारण आरक्षण सोडतीत हे तीन गट महिलांसाठी आरक्षित झाले. या गटातून निवडणूक लढण्यासाठी अनेक पुरुष उमेदवारांनी आपले नामांकन यापूर्वी दाखल केले होते. परंतु आता येथे पुरुष उमेदवारांना निवडणूक लढता येणार नाही.
जिल्हा परिषदतालुका गट आरक्षणतुमसर चुल्हाड सर्वसाधारणतुमसर सिहोरा सर्वसाधारण स्त्री तुमसर गर्रा सर्वसाधारणमोहाडी कांद्री सर्वसाधारण स्त्रीमोहाडी डोंगरगाव सर्वसाधारणमोहाडी वरठी सर्वसाधारणलाखनी लाखोरी सर्वसाधारण स्त्रीलाखनी मुरमाडी सर्वसाधारण स्त्रीलाखनी केसलवाडा सर्वसाधारण स्त्रीलाखनी मुरमाडी तु. सर्वसाधारण भंडारा सिल्ली सर्वसाधारण स्त्रीपवनी ब्रम्ही सर्वसाधारण पवनी भुयार सर्वसाधारण स्त्री
पंचायत समितीतालुका गण आरक्षणतुमसर साखळी सर्वसाधारण स्त्री तुमसर आंबागड सर्वसाधारण स्त्री तुमसर खापा सर्वसाधारणतुमसर देव्हाडी सर्वसाधारण स्त्री तुमसर माडगी सर्वसाधारणमोहाडी पाचगाव सर्वसाधारण स्त्री मोहाडी मोहगाव सर्वसाधारणमोहाडी पालोरा सर्वसाधारण स्त्रीसाकोली कुंभली सर्वसाधारण स्त्रीसाकोली वडद सर्वसाधारण स्त्रीसाकोली सानगडी सर्वसाधारणलाखनी सालेभाटा सर्वसाधारणलाखनी केसलवाडा सर्वसाधारण स्त्रीलाखनी किटाडी सर्वसाधारण स्त्रीपवनी चिचाळ सर्वसाधारण स्त्रीपवनी पिंपळगाव सर्वसाधारणपवनी कोदुर्ली सर्वसाधारण स्त्रीलाखांदूर मासळ सर्वसाधारण स्त्रीलाखांदूर भागडी सर्वसाधारणलाखांदूर पिंपळगाव सर्वसाधारण स्त्री