घरकूल लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँक खात्यात

By Admin | Updated: November 10, 2015 00:48 IST2015-11-10T00:48:16+5:302015-11-10T00:48:16+5:30

शासनाच्या इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आॅनलाईन निधी पुरविण्यात येत असून...

Subsidy grant to the beneficiary directly into the bank account | घरकूल लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँक खात्यात

घरकूल लाभार्थ्यांचे अनुदान थेट बँक खात्यात

लाखनी : शासनाच्या इंदिरा आवास योजनेच्या लाभार्थ्यांना आॅनलाईन निधी पुरविण्यात येत असून राज्य शासनाने दिलेले घरकूलचे उद्दिष्ट स्थानिक पंचायत समितीच्या बांधकाम विभागामार्फत पूर्णत्वास नेले असल्याची माहिती खंडविकास अधिकारी मिलिंद बडगे यांनी दिली आहे. लाभार्थ्यांचे पेमेंट सरळ बँक खात्यावर जमा करण्यात येत असल्याने लाभार्थ्याला पंचायत समितीमध्ये चकरा मारण्याची आवश्यकता राहिली नाही.
तालुक्यात इंदिरा आवास योजनेचे सन २०१४-१५ चे २४५ घरकुलाचे उद्दिष्ट होते. २९३ घरकूल मंजूर करण्यात आले. अद्याप काम पूर्ण झालेले १७५ लाभार्थी आहेत. १८४ लाभार्थ्यांना घरकुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्याचे अनुदान देण्यात येणार आहे. घरकुालसाठी १ लक्ष रुपयाचे अनुदान दिले जाते. सन २०१५-१६ साठी शासनाने पहिल्या टप्प्यात २३४ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दिले आहे. ८१५ व्यक्तींनी घरकुलासाठी नोंदणी केली आहे.
पहिल्या टप्प्याच्या बांधकामासाठी ३९ लाभार्थ्यांचा निधी बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई घरकूल योजनेची १०० घरकुलाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १०० मंजूर करण्यात आले. १५ घरकुलाचे काम सुरु आहे. २०१३-१४ मध्ये ३४१ घरकुलाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. त्यापैकी ८२ घरकूल मंजूर करण्यात आले. त्यापैकी २० घरकुलाचे काम सुरु आहे. १३ व्या वित्त आयोग पंचायत समिती स्तरावरील सन १४-१५ मध्ये ३४ कामे मंजूर होती. त्यातील ३४ कामे सुरु झाली. २९ घरकुलाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. राजीव गांधी ग्रामीण निवारा योजनेद्वारे सन २०१४-१५ मध्ये ३१ घरकूल मंजूर करण्यात आले. त्यापैकी २१ घरकुल पूर्ण झाले आहे. अनुसूचित जमाती व अल्पसंख्यकांना घरकूल देण्यावर भर देण्यात येत असल्याची माहिती कनिष्ठ अभियंता धनंजय बागडे यांनी दिली आहे. खंडविकास अधिकारी बडगे व कनिष्ठ अभियंता धनंजय बागडे यांच्या मार्गदर्शनात लाभार्थ्यांना निवारा उपलब्ध करून दिला जात असून निधी बँक खात्यात परस्पर जमा करण्यात येते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Subsidy grant to the beneficiary directly into the bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.