सनफ्लॅग कंपनीच्या संपाचा विषय केंद्रीय मंत्र्यांच्या दालनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:03+5:302021-03-27T04:37:03+5:30

भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती करणाऱ्या सनफ्लॅग कंपनीने मागील दोन वर्षांत सर्वाधिक उत्पादन केले आहे. कोरोना संकटाची पार्श्‍वभूमी ...

The subject of the strike of the Sunflag company in the hall of the Union Minister | सनफ्लॅग कंपनीच्या संपाचा विषय केंद्रीय मंत्र्यांच्या दालनात

सनफ्लॅग कंपनीच्या संपाचा विषय केंद्रीय मंत्र्यांच्या दालनात

भंडारा जिल्ह्यात मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती करणाऱ्या सनफ्लॅग कंपनीने मागील दोन वर्षांत सर्वाधिक उत्पादन केले आहे. कोरोना संकटाची पार्श्‍वभूमी असूनसुद्धा सुमारे दोन हजार कामगार अहोरात्र काम करीत होते. कंपनी उत्तम स्थितीत सुरू असताना देखील कोरोनाचे कारण देऊन ९०० कामगारांना कामावरून अचानक कमी करण्यात आले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रदूषण नियंत्रणासंबंधी योग्य उपाययोजना नसल्याने नजीकच्या ग्रामपंचायतने व असंख्य नागरिकांनी कंपनीकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु, यासंबंधी कुठलीही कार्यवाही कंपनीने केली नाही. कंपनीत अपुरी सुरक्षा व्यवस्था असल्यामुळे कामगारांना अपघातांना सामोरे जावे लागते व अपंगत्व येते. कामगारांचे मृत्यूसुद्धा झाले आहेत. २०१७ पासून करारबद्ध असलेली वेतनवाढ बेकायदेशीररीत्या रोखून ठेवणे, यामुळे कामगारांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली आहे. यासाठी कंपनी व्यवस्थापनाची सखोल चौकशी होणे कामगारांच्या व विभागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे खासदार सुनील मेंढे यांनी या मागणीत नमूद केले आहे.

Web Title: The subject of the strike of the Sunflag company in the hall of the Union Minister