Subject: Fwd: Tumsar news To: ems.lokmat FROM: Rahul Bhutange
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST2021-04-04T04:36:23+5:302021-04-04T04:36:23+5:30
विद्यार्थ्यांनी घेतला नवा संकल्प : मांडवीच्या जिल्हा परिषद शाळेतर्फे सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ तुमसर : तुमसर तालुक्यातील मांडवीच्या जिल्हा ...

Subject: Fwd: Tumsar news To: ems.lokmat FROM: Rahul Bhutange
विद्यार्थ्यांनी घेतला नवा संकल्प : मांडवीच्या जिल्हा परिषद शाळेतर्फे सातवीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ
तुमसर : तुमसर तालुक्यातील मांडवीच्या जिल्हा परिषद शाळेत होळी सणाचे औचित्य साधून इयत्ता ५ वीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेतील उपक्रमशील शिक्षक दामोदर डहाळे यांच्या मार्गदर्शनात स्वतःतील वाईट गुण कागदावर लिहून काढून त्यांची प्रतीकात्मक होळी केली. प्रत्येक विद्यार्थ्यांनी ते दोष दूर करण्याचे उपाय म्हणून 'माझा नवा संकल्प' या अभिनव उपक्रमांतर्गत त्यांचा संकल्प घेऊन तो आजन्म जोपासण्याची मान्यवरांच्या उपस्थितीत शपथसुद्धा घेतली.
सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात इ. ७ वी मधून इ. ८ वी मध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप म्हणून शाळेतर्फे निरोप समारंभाचे आयोजन केले होते.
यानिमित्ताने इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांतर्फे शाळेला घड्याळ स्नेहभेट म्हणून देण्यात आले. तसेच सहावीच्या विद्यार्थ्यांकडून सातवीच्या प्रत्येक विद्यार्थ्याला पिण्याच्या पाण्याची बाटली भेटवस्तू म्हणून देण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये त्यांच्या जीवनाचा पाया मजबूत झाल्याचे सांगून या भक्कम पायावर त्यांनी यशाची इमारत तयार करण्याचे सुचवून पूढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. इयत्ता सातवीच्या सर्वच विद्यार्थ्यांनी मांडवीच्या शाळेमध्ये त्यांना आलेले सर्व बरे-वाईट अनुभव त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले. तसेच मांडवीच्या शाळेने केलेले संस्कार आणि दिलेले ज्ञान भविष्यातसुद्धा जोपासण्याचे आश्वासन दिले.
निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्रकुमार सरोदे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शापोआ अधीक्षक तथा केंद्रप्रमुख टी. ए. कटनकार, मुख्याध्यापक पी. डी. राऊत, पदवीधर शिक्षिका के. डी. पटले तसेच सहाय्यक शिक्षक एन. जी. रायकवार व दामोदर डहाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन इयत्ता सहावीच्या राणु मते हिने केले तर साक्षी ढबाले हिने उपस्थित मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमासाठी इयत्ता पाचवी व सहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी तसेच शाळेतील स्वयंपाकी मंगला ढबाले व मदतनीस सरिता मते यांनी सहकार्य केले.