शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक
By Admin | Updated: April 29, 2015 00:36 IST2015-04-29T00:36:02+5:302015-04-29T00:36:02+5:30
शेती कसणारे वडिल सरपंच झाले. घरी येणाऱ्या अधिकाऱ्यांचा रूबाब पाहून आई-वडिलांना मुलगा अधिकारी व्हावा, ..

शेतकऱ्याचा मुलगा झाला पोलीस उपनिरीक्षक
लोकमत शुभवर्तमान : नितीन म्हणाला, जिद्दीने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते
युवराज गोमासे करडी (पालोरा)
शेती कसणारे वडिल सरपंच झाले. घरी येणाऱ्या अधिकाऱ्यांचा रूबाब पाहून आई-वडिलांना मुलगा अधिकारी व्हावा, असे मनोमनी वाटायचे. ही तळमळ त्यांनी मुलासमोर अनेकदा बोलून दाखविली. आणि मुलगा कामाला लागला. मेहनतीच्या भरवशावर तो राज्यसेवा परीक्षेत उतीर्ण झाला. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्याची निवड झाली असून पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षणाला रूजू झाला आहे. नितीन भगवान आगासे (२७) रा.निलज खुर्द असे त्या यशस्वी तरूणाचे नाव आहे.
मोहाडी तालुक्यातील १,२०० लोकसंख्येचे निलज खुर्द एक छोटेसे गाव. बारमाही कृषी पंपाना पाणी असल्याने शेतीत हिरवेगार पीक दिसते. भगवान आगासे यांच्याकडे शेती असून दूध व गुळ घाणीचा व्यवसाय करतात. पती पत्नी दोघेही अल्पशिक्षित असले तरी श्ेती मात्र आधुनिक पद्धतीने कसतात. दोन मुले व एक मुलगी असून त्यांनी पाल्यांना उच्च शिक्षण दिले.
वडिल सरपंच झाल्यानंतर घरी अधिकाऱ्यांची यायचे. त्यांना पाहून आपलेही मुले प्रशासकीय अधिकारी व्हावे, ही त्यांची तळमळ मुलांपुढे बोलून दाखवायचे. आई-वडिलाची प्रेरणा घेऊन नितीनने प्रशासकीय सेवेत जाण्याचे ठरविले. नागपूर येथे सहा महिने स्पर्धा परीक्षेचा कोर्स पूर्ण केला. गावात परतल्यानंतर करडी येथे परिसरातील मुलांसाठी स्पर्धा परिक्षा वर्ग सुरू केले. तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश आले. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्याची निवड झाली असून प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र पोलीस अॅकेडमी नाशिक येथे २७ एप्रिल रोजी तो रूजू झाला.
माणूस प्रयत्नाने मोठा होता. सातत्याने प्रयत्न केल्यास यश हमखास मिळते. तरूण या क्षेत्राकडे वळत नाही. मेहनतीला घाबरतात. परंतू ग्रामीण तरूणांनी न घाबरता नेटाने प्रयत्न करावे. महागडे वर्ग केले नाही तरी स्वकष्टाने सुद्धा यशस्वी होता येते.
शेतकरी व गरिबांना मुलांना शिकविण्यासाठी खुप कष्ट पडतात. ती सोसण्याचीही आई-वडिलांची तयारी असते, मात्र मुलांनी सुद्धा कष्ट उपसण्याची तयारी ठेवली पाहिजे. मिळालेल्या यशावरच आपले समाधान नसून उच्च पदासाठी पुन्हा प्रयत्न सुरूच राहतील, असा संदेश प्रशिक्षणासाठी निघालेल्या नितीनने तरूणांना दिला आहे.
मुलगा अधिकारी झाला. आमच्या कष्टाचे चीज झाले. लहान मुलालाही प्रशासकीय अधिकारी बनवायचे आहे. मुलीलाही स्पर्धा परीक्षांकडे वळविणार आहे. आम्ही शिकू शकलो नाही, मात्र मुलांना यशस्वी करण्याचा निर्धार नितीनच्या आई-वडिलांनी यावेळी व्यक्त केला.