१२ डिसेंबर पर्यंत होणार शाळांची पटपडताळणी

By Admin | Updated: November 27, 2014 23:29 IST2014-11-27T23:29:52+5:302014-11-27T23:29:52+5:30

राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांची पटपडताळणी दि.२५ नोव्हेंबर ते १२ वी पर्यंतच्या शाळांची पटपडताळणी दि.२५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०१४ या

Students will be accorded their resignation till December 12 | १२ डिसेंबर पर्यंत होणार शाळांची पटपडताळणी

१२ डिसेंबर पर्यंत होणार शाळांची पटपडताळणी

पवनी : राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंतच्या शाळांची पटपडताळणी दि.२५ नोव्हेंबर ते १२ वी पर्यंतच्या शाळांची पटपडताळणी दि.२५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०१४ या कालावधीत पूर्ण करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे कार्यालयाने निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे १२ डिसेंबर पूर्वी सर्व शाळांची पटपडताळणी करण्यात येणार आहे.
दि.१३ डिसेंबर २०१३ व शासन निर्णयानुसार ३० सप्टेंबरचे पटसंख्येवर आधारित संचमान्यता करण्याचे आदेशित केले असून त्यानुसार यु डिस्क डाटा घेणेचे संदर्भीत केलेले आहे.
संच मान्यतेच्या आधारे व विद्यार्थी पटसंख्येच्या आधारे शिक्षक पदे व तुकड्या निश्चित केल्या जातात. यु डिस्क वरील पटसंख्या अचूक ठेवण्याच्या दृष्टीकोनातून ३० सप्टेंबरच्या पटसंख्येची पडताळणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे सन २०१४-१५ या वर्षाकरीता दि.२५ नोव्हेंबर ते १२ डिसेंबर २०१४ या कालावधीत पटपडताळणी करण्यात येणार आहे.
राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी माध्यमिक, शिक्षणाधिकारी प्राथमिक व निरंतर शिक्षण यांनी संयुक्तरित्या इयत्ता १ ली ते १२ वी पटपडताळणी करावी. सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची पटपडताळणी करावयाची असल्याने केंद्रप्रमुख व त्यावरील क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शाळांचे वाटप करण्यात येणार आहे. एकच विद्यार्थी दोन्हीकडे आल्यास त्याची खातरजमा करण्यासाठी एका गावातील सर्व शाळा एकाच अधिकाऱ्याकडे पटपडताळणीसाठी देण्यात याव्या, असे निर्देश शिक्षण संचालक माध्यमिक सर्जेराव जाधव व शिक्षण संचालक प्राथमिक महावीर माने यांनी पत्रकाद्वारे शिक्षणाधिकारी यांना कळविले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Students will be accorded their resignation till December 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.