विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा
By Admin | Updated: January 24, 2016 00:40 IST2016-01-24T00:40:48+5:302016-01-24T00:40:48+5:30
हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापिठात पीएचडीचा विद्यार्थी असलेला रोहित वेमुला याने आत्महत्या केली.

विद्यार्थी आत्महत्याप्रकरणी दोषींवर कारवाई करा
घटनेचा नोंदविला निषेध : जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
भंडारा : हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापिठात पीएचडीचा विद्यार्थी असलेला रोहित वेमुला याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्ये प्रकरणी केंद्रीय मंत्र्यांना जबाबदार धरुन त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी बहुजन समाज पार्टी व बहुजन रिपब्लिकन सोसालिस्ट पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
गुंटूर येथील रोहित वेमुला हा केंद्रीय विद्यापिठात पीएचडी करीत होता. १८ जानेवारीला त्याने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येला केंद्रीय मंत्री बंगाळु दत्तात्रेय व स्मृती इराणी जबाबदार असल्याचा आरोप करुन दोघांवर बडतर्फीची कारवाई करावी अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष त्र्यंबक घरडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केली आहे. यावेळी एम. जे. वानखेडे, यशवंत वैद्य, गिरीश गजभिये, केशव रामटेके, डॉ. ए. पी. संघरत्ने, रोहीत डहाट, अमर मेश्राम, प्रशांत मेश्राम आदी उपस्थित होते.
रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष
विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी बहुजन सोसालिस्ट पक्षाचे संजय गाढवे यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळात झेड. आर. दुधकवर, मनोज गोस्वामी, ज्ञानेश्वर वाघाडे, संजय रामटेके, प्रेमलाल वासनिक, मनोज गोस्वामी, संदेश ठवरे, नारद गणविर, भारत गोडाणे, नाजीर मेश्राम, चंद्रकुमार रामटेके, सुभाष गवई, पन्नालाल नंदागवळी, महेश मेश्राम, राघवन हुमणे, अर्चना वाहणे, विमल कांबळे, रंजना बागडे, लक्ष्मी मेश्राम, दिप्ती बन्सोड, आशा देशभ्रतार, सुधा गजभिये, जोत्सना गजभिये, हेमा गजभिये आदींचा समावेश होता.
बुध्दीस्ट युथ संघटना
नॅशनल नेटवर्क आॅफ बुद्धिस्ट युथ संघटनेच्या वतीने रोहितच्या आत्महत्येचा निषेध करण्यात आला. शहरातील त्रिमुर्ती चौकात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन मृतक रोहितला न्याय द्या व जबाबदार अधिकारीवर कारवाई करा, असे फलक हातात घेऊन घटनेचा निषेध नोंदविला. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. (शहर प्रतिनिधी)