विद्यार्थिनींनी संरक्षणार्थ कायदे समजून घ्यावे
By Admin | Updated: February 24, 2017 00:39 IST2017-02-24T00:39:02+5:302017-02-24T00:39:02+5:30
महिलांवरील वाढते अन्याय व अत्याचार लक्षात घेता शासनाने त्यांच्या संरक्षणार्थ कित्येक हितकारक कायदे तयार केलेले आहेत.

विद्यार्थिनींनी संरक्षणार्थ कायदे समजून घ्यावे
धनश्री डहाके यांचे प्रतिपादन : महिला कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम
पवनी : महिलांवरील वाढते अन्याय व अत्याचार लक्षात घेता शासनाने त्यांच्या संरक्षणार्थ कित्येक हितकारक कायदे तयार केलेले आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थीनींनी त्यांच्या संरक्षणार्थ असलेले कायदे समजून घ्यावे, असे प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक धनश्री डहाके यांनी केले.
महिला व बालविकास विभाग तालुका संरक्षण अधिकारी कक्षाचेवतीने स्व. हरिश्चंद्र पाटील सावरबांधे कला-वाणिज्य महाविद्यालयात महिलांचे अधिकार व महिला कायदेविषयक जनजागृती कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम कायदा २००५, हुंडा प्रतिबंधक कायदा १९६१, स्त्रियांचे अश्लिल प्रदर्शन विरोधी कायदा १९८६ आहेत. परंतु बरेचदा अत्याचारीत महिला तक्रार देण्यासाठी पोलिसांत पोहचत नाही. परिणामी अत्याचारात वाढ होत जाते. वेळीच दखल घेवून न्याय व हक्क मागणीसाठी महिलांनी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतीबा फुले विद्यालय धानोरीचे मुख्याध्यापक अशोक पारधी होते. प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य अंबादे संरक्षण अधिकारी (साकोली) सी.एच. लोथे, संरक्षण अधिकारी (लांखादूर) व्ही. पी. भेंडारकर, संरक्षण अधिकारी (पवनी) के.पी. जिभकाटे उपस्थित होते. हुंडा प्रथेला संपूष्ठात आणण्यासाठी प्रत्येक युवकांनी मी हुंडा घेणार नाही व देणार नाही असा संकल्प करावा. शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत करुन स्वावलंबी बनण्यासाठी स्पर्धा परिक्षांची तयारी करावी व त्यानंतर लग्नाचा विचार करुन स्वत:चा जोडीदार निवडावा म्हणजे हुंडा घेण्याचा व्ही. पी. भेंडारकर यांनी महिला व बालकांचे हक्काविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक पवनी कक्षाचे सरंक्षण अधिकारी के. पी. जिभकाटे यांनी संचालन प्रा. चन्ने तर आभार प्रा. रजनी थोटे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन विद्यार्थीनी व विद्यार्थी तसेच प्राध्यापक वृंद उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)