विद्यार्थ्यांनी जीवनाला आकार द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 22:33 IST2018-01-21T22:32:19+5:302018-01-21T22:33:01+5:30

मानवी जीवनात अनेक चढउतार येतात. त्याला न घाबरता सर्वांनी आलेल्या संकटांना सामोरे जात जीवनाला आकार द्यावा.

Students should shape their life | विद्यार्थ्यांनी जीवनाला आकार द्यावा

विद्यार्थ्यांनी जीवनाला आकार द्यावा

ठळक मुद्देविजयकांत दुबे : जि.प. शासकीय कर्मचारी संस्थेचा गुणगौरव कार्यक्रम

आॅनलाईन लोकमत
भंडारा : मानवी जीवनात अनेक चढउतार येतात. त्याला न घाबरता सर्वांनी आलेल्या संकटांना सामोरे जात जीवनाला आकार द्यावा. कुणीही स्वत:ला उपेक्षित न समजता आयुष्याला उभारी देण्यासाठी स्पर्धात्मक जिद्द ठेऊन यश गाठावे, असे प्रतिपादन उपशिक्षणाधिकारी विजयकांत दुबे यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद व शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्यावतीने रविवारला आयोजित गुणवंत विद्यार्थी, सेवानिवृत्त सभासद व पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या गौरव कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष केशव बुरडे, उपाध्यक्ष सुरेश कश्यप, अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश सिंगनजुडे, महाराष्ट्र राज्य प्राथ. शिक्षक समिती गोंदियाचे जिल्हाध्यक्ष मनोज दीक्षित, जि.प. माध्य. व उच्च माध्य. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष धनंजय बिरणवार, महा.राज्य प्राथ. शिक्षक समितीचे अध्यक्ष ईश्वर नाकाडे, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष ओ.बी. गायधने, राज्य पदाधिकारी मोहन पडोळे, कास्ट्राईब संघटनेचे विभागीय सहसचिव मनिष वाहाणे, संस्थेच्या संचालिका विजया कोर, पुरोगामी शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष ईश्वर ढेंगे, केंद्र प्रमुख संघटना अध्यक्ष जयंत उपाध्य उपस्थित होते. संस्थाध्यक्ष केशव बुरडे म्हणाले, संस्काराच्या शिदोरीशिवाय जीवनात परमोच्च स्थान गाठता येत नाही. आईवडील, गुरुजनांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन जीवनात यश मिळवावे, असे प्रतिपादन केले. रमेश सिंगनजुडे म्हणाले, गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्तरोत्तर प्रगती करून कुटुंबांचे नावलौकिक करावे. विद्यार्थ्यांनी वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात. निवृत्तांनी समाजसेवा करून आयुष्य घालवावे, असे प्रतिपादन केले. यावेळी मोहन पडोळे, धनंजय बिरणवार, मनिष वाहाणे, ईश्वर नाकाडे, मनोज दीक्षित आदींनी मार्गदर्शन केले. संचालन किशोर ईश्वरकर यांनी तर आभारप्रदर्शन डी.एम. खाटे यांनी केले. कार्यक्रमाला सभासद, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.
३०४ जणांचा गौरव
कार्यक्रमादरम्यान १४० सेवानिवृत्त सभासद, १४६ दहावी व बारावी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी, १३ क्रीडाक्षेत्रातील उत्कृष्ट खेळाडू, पाच राष्ट्रीय व राज्य स्तरावरील पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा अशा ३०४ जणांना गौरविण्यात आले.

Web Title: Students should shape their life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.