विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येयाने पुढे जावे

By Admin | Updated: August 24, 2015 00:44 IST2015-08-24T00:44:56+5:302015-08-24T00:44:56+5:30

विद्यार्थ्यांनो सर्वांगीण विकासाकरिता आयुष्यात म्हणजे विद्यार्थी जीवनात निश्चित ध्येय ठरवा.

Students should go ahead with certain goals | विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येयाने पुढे जावे

विद्यार्थ्यांनी निश्चित ध्येयाने पुढे जावे

युथ जनरेशन कार्यक्रम : माधव नवखरे यांचे प्रतिपादन
पालांदूर : विद्यार्थ्यांनो सर्वांगीण विकासाकरिता आयुष्यात म्हणजे विद्यार्थी जीवनात निश्चित ध्येय ठरवा. अशक्यच ते शक्य करण्याकरिता अथक प्रयत्नांची पराकाष्ठा करा. निर्व्यसनी आयुष्य जगून समाजाला काही देणे लागते याची जाणीव मनात ठेवा, असे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य माधव नवखरे यांनी केले.
गोविंद विद्यालयाच्या प्रांगणात युथ जनरेशन या कार्यक्रमात ते बोलत होते. मंचावर सेवानिवृत्त प्राचार्य नत्थूजी फरांडे, ठाणेदार एच.एम. सय्यद, सभापती विनायक बुरडे, उपसभापती विजय कापसे, जिल्हा परिषद सदस्य वर्षा रामटेके, पंचायत समिती सदस्य वंदना गवळे, प्रा. युवराज खोब्रागडे, दिलीप चित्रीवेकर, द.सा. हटवार, शिक्षक कापगते, मिथिलेश आथिलकर आदी उपस्थित होते.
प्रा.खोब्रागडे यांनी, कर्तबगारीची सुरुवात प्रत्येकांनी स्वत:पासून करायची असते. वेळेचे महत्व जाणून जगाच्या बदलत्या प्रवाहात स्वत:लाही काळाबरोबर बदलायचे असते. स्वामी विवेकानंदला डोळ्यासमोर ठेवून आयुष्याचे ध्येय ठरविले तर जबाबदार नागरिक घडायला वेळ लागणार नाही. चित्रीवेकर यांनी, संघटना तयार करणे सोपे आहे पण टिकवून विचारांची धार तेवत ठेवणे कठीण आहे. आईवडील गुरु यांना आयुष्यात सन्मानाने स्थान द्या. वेळेचा सदुपयोग करा, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.(वार्ताहर)

Web Title: Students should go ahead with certain goals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.