विद्यार्थांनी शालेय जीवनापासूनच वाहतूक नियमांचे पालन करावे

By Admin | Updated: October 14, 2016 03:33 IST2016-10-14T03:33:48+5:302016-10-14T03:33:48+5:30

शहरातील वर्दळ लक्षात घेता, रस्ते अरूंद पडत आहेत. तसेच अतिक्रमण ही बाब नित्याची असल्याचे दिसते.

Students should also follow the traffic rules from school life | विद्यार्थांनी शालेय जीवनापासूनच वाहतूक नियमांचे पालन करावे

विद्यार्थांनी शालेय जीवनापासूनच वाहतूक नियमांचे पालन करावे

गोकुळ राऊत यांचे प्रतिपादन : शालेय परिवहन समितीची सभा
भंडारा : शहरातील वर्दळ लक्षात घेता, रस्ते अरूंद पडत आहेत. तसेच अतिक्रमण ही बाब नित्याची असल्याचे दिसते. एवढेच नाही तर बरेचजण नियमाचे पालन करीत नसल्याने अपघाताच्या घटना घडत असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन भंडारा वाहतूक पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत यांनी केले. स्थानिक बं.ला नूतन महाराष्ट्र विद्यालय येथे शालेय परिवहन समितीच्या सभा आयोजनाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका लोणारे या होत्या. अतिथी म्हणून भंडारा वाहतूक पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत तसेच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष राजू आगलावे, नगरसेवक धनराज साठवणे, वाहतूक पोलीस कठाने, वंजारी उपमुख्याध्यापक टीचकुले , पर्यवेक्षक बारई, राठी व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व प्रत्येक वर्गाचे पालक प्रतिनिधी उपस्थित होते.
वाहतूक पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत यांनी शालेय परिवहन समिती सभेनिमित्य रस्ता सुरक्षा, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच वाहतूक नियमांचा पालन करावे, शालेय परीवहन समितीची निर्मिती का करावी? वाहतूक नियम पाळावे आदीबाबत मार्गदर्शन केले. राजू आगलावे यांनी प्रत्येकानी स्वत: पासून जबाबदारीची भूमिका ठेवून शिस्तीचे पालनाची सुरूवात करावी. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती विषयी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका लोणारे यांनीही सभेला मार्गदर्शन केले. संचालन देशभ्रतार व आभार मुख्याध्यापिका लोणारे यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Students should also follow the traffic rules from school life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.