शहरं
Join us  
Trending Stories
1
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सूचना
2
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
3
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
4
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
5
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
6
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
7
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
9
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
10
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
11
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
12
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
13
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
14
हृदयद्रावक! "बेटा, मी येतोय...", वडिलांचा लेकीला शेवटचा कॉल; पतंगाच्या मांजामुळे गमावला जीव
15
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
16
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
17
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
18
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
19
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
20
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
Daily Top 2Weekly Top 5

गाडीचा आवाज आला की विद्यार्थी घेतात धाव; शिक्षकाचे फिरते वाचनालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2020 21:50 IST

लाखनी तालूक्यातील जिल्हा परिषद शाळा मांगली येथे कार्यरत राज्य पुरस्कारप्राप्त उपक्रमशील पदवीधर शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी  फिरत्या बाल वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन सुरू ठेवण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे.

ठळक मुद्देदुचाकीवरुन पुस्तके वितरणमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली शिक्षकाच्या उपक्रमाची दखल

चंदन मोटघरेलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाने सध्यस्थितीत अनिश्चित काळासाठी शाळा बंद आहेत. शासन स्तरावरून शाळा बंद ...पण शिक्षण आहे ही अभ्यासमाला सुरू आहे. परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने शिक्षण काही ठिकाणी जवळपास ठप्प पडल्याचे चित्र आहे.मात्र असे असले तरीही काही शिक्षक आपापल्या परीने विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून शिक्षणात नवनवीन उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. लाखनी तालूक्यातील जिल्हा परिषद शाळा मांगली येथे कार्यरत राज्य पुरस्कारप्राप्त उपक्रमशील पदवीधर शिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी  फिरत्या बाल वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे वाचन व लेखन सुरू ठेवण्यासाठी उपक्रम सुरु केला आहे.

त्यांनी आपल्या स्वत:च्या मोटार सायकलच्या सिटवर प्लायवूडची पेटी बांधून त्यात शालेय बाल वाचनालयातील पुस्तके ठेवून ती विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोचवून देत आहेत. आपल्या मोटार सायकलला विशिष्ट आवाज करणारा हॉर्न लावला असून तो आवाज ऐकताच विद्यार्थी मास्कसह पटापट पुस्तके घेण्यासाठी घराबाहेर धाव घेतात. वाचनासाठी दिलेल्या पुस्तकांमधूनच लेखन करावयास सांगून विद्यार्थ्यांना कृतिशिल ठेऊन त्यांच्या वाचनात व लेखनात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमाची दखल जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस.व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था भंडाराचे जेष्ठ अधिव्याख्याता गुलाब राठोड, विस्तार अधिकारी राघोर्ते, केंद्रप्रमुख वाढीवे, आत्राम, दुधकवार यांनी उपक्रमाचे कौतुक केले आहे. अनेक शिक्षकाकडूनही उपक्रमाचे कौतुक होत असून आपल्या शाळेत हा उपक्रम प्रत्यक्ष राबवण्याचा निर्धार केला आहे.गाडीचा आवाज ऐकताच विद्यार्थी घेतात धावशिक्षक पुरुषोत्तम झोडे यांनी फिरत्या बाल वाचनालयाच्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची वाचनाची आवड जोपासली आहे. यासाठी ते आठवड्यातून दोनवेळा पुस्तके बदलासाठी दुचाकीवरुन फिरतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी नवनवे उपक्रम राबवल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचा सहभाग वाढला आहे. विद्यार्थी गाडीचा आवाज ऐकताच गाडीकडे धाव घेतात. कोरोनाची दक्षताही घेत असल्याचे झोडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षक