लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी, एनटी प्रवर्गातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना ज्यांचे उत्पन्न २.५० लाखांच्या आत आहे, तसेच एनटी विद्यार्थी ज्यांचे उत्पन्न दीड लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या वतीने शिष्यवृत्तीचा लाभदिला जातो. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यामुळे ही शिष्यवृत्ती शासनाकडे अद्यापही प्रलंबित असल्याची बाब ओबीसी सेवा संघाच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्याय व इतर मागास बहुजन कल्याण विभागाला भेट दिली असता उघडकीस आली. प्रकरणी शासन-प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात सावित्रीबाई फुले व्हीजे एनटी (मुली) शिष्यवृत्ती रुपये ७ लाख ४२ हजार रुपये (आठवी ते दहावीकरिता), सावित्रीबाई फुले ओबीसी (मुली) (इयत्ता पाचवी ते सातवी करिता) रुपये १ कोटी ७० लाख २९ हजार, तसेच सावित्रीबाई फुले ओबीसी मुली (इयत्ता आठवी ते दहावीकरिता) रुपये १ कोटी १६ लाख १७ हजार एवढी रक्कम वितरणासाठी उपलब्ध झाली आहे. विभागाचे योगीराज सावरबांधे व रणवीर यांचेशी चर्चा करतेवेळी ओबीसी सेवा संघाचे संजीव बोरकर, उपाध्यक्ष अरुण जगनाडे, कोषाध्यक्ष रमेश शहारे, संघटक सेवक हजारे, जिल्हा प्रसिद्धिप्रमुख गोपाल देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
विद्यार्थी भोजन, निर्वाह भत्त्यापासून वंचितराज्यातील पहिले ओबीसी, एनटी विद्यार्थी वसतिगृह जिल्ह्यात सुरू झाले. परंतु, वसतिगृहातील विद्यार्थी भोजन भत्ता व निर्वाह भत्त्यापासून वंचित आहेत. स्वतःच्या खर्चातून कसेबसे दिवस काढत आहेत. याविषयी विचारणा झाली असता खर्च प्रदानाची नस्ती कोषागारात पाठविल्याची माहिती मिळाली.
यावर्षीपासून शिष्यवृत्ती वितरण करणारओबीसी, एनटी समाजाच्या योजना स्वतंत्र विभागाद्वारे कार्यान्वित कराव्यात, यासाठी पर्याप्त मनुष्यबळ उपलब्ध करावे, ही मागणी मान्य करून शिष्यवृत्ती वितरणाचा कार्यभार इतर मागास व बहुजन कल्याण विभागाकडे वर्ग केल्याची माहिती मिळाली. हे ओबीसी सेवा संघ व ओबीसी सेवा संघ व ओबीसी महिला सेवा संघाच्या सातत्याच्या मागणीचे फलित मानले जात आहे.
ही शिष्यवृत्ती वेळेत लाभार्थी विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही त्वरित सुरू करावे. जेणेकरून मागील वर्षी प्रमाणे रक्कम परत जाण्याची नामुष्की विभागावर येऊ नये. याची आठवणही ओबीसी सेवा संघ पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना करून दिली.
विद्यार्थी भोजन, निर्वाह भत्त्यापासून वंचितराज्यातील पहिले ओबीसी, एनटी विद्यार्थी वसतिगृह जिल्ह्यात सुरू झाले. परंतु, वसतिगृहातील विद्यार्थी भोजन भत्ता व निर्वाह भत्त्यापासून वंचित आहेत. स्वतःच्या खर्चातून कसेबसे दिवस काढत आहेत. याविषयी विचारणा झाली असता खर्च प्रदानाची नस्ती कोषागारात पाठविल्याची माहिती मिळाली.