विद्यार्थ्यांनो, पुस्तकांना आपले मित्र बनवा

By Admin | Updated: October 16, 2016 00:25 IST2016-10-16T00:25:23+5:302016-10-16T00:25:23+5:30

मुलांच्या भावी जीवाची मुहूर्तमेढ लहान वयातच रोवली जाते. याच वयापासून यशाची पायरी चढता येते.

Students, make books your friends | विद्यार्थ्यांनो, पुस्तकांना आपले मित्र बनवा

विद्यार्थ्यांनो, पुस्तकांना आपले मित्र बनवा

उपजिल्हाधिकाऱ्यांचा सल्ला : मोहगाव, नेरी केंद्रातील शाळांना भेट
मोहाडी : मुलांच्या भावी जीवाची मुहूर्तमेढ लहान वयातच रोवली जाते. याच वयापासून यशाची पायरी चढता येते. बालपणापासून वाचनाची आवड लावली पाहिजे. अभ्यासाशिवाय इतर पुस्तकांचे वाचन व्हावे. दररोजच्या वाचनाने क्षमता वाढीला लागते. मुख्य म्हणजे वाचनाची प्रेरणा स्वत:च्या लाभासाठी असते. जीवन समद्ध करायला पुस्तकांना आपले सर्वाेत्तम बनविले पाहिजे, असा सल्ला भंडारा उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
वाचन प्रेरणादिनी शाळांना भेटी देण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी रोहयो सुनिल पडोळे मोहगावदेवी केंद्रात आले होते. यावेळी त्यांनी मोहगाव देवी केंद्रातील जि.प. प्राथमिक शाळा बोथली, जि.प. प्राथमिक शाळा मोहगाव टोली, जि.प. केंद्रीय पूर्व माध्यमिक शाळा मोहगाव देवी, जि.प. प्राथमिक शाळा दहेगाव, जिल्हा परिषद हायस्कूल मोहाडी या शाळांना भेटी दिल्या. यावेळी मोहगाव देवी केंद्राच्या केंद्र प्रमुख तेजस्विनी देशमुख उपस्थित होत्या.
शाळा भेटी दरम्यान उपजिल्हाधिकारी रोहयो सुनिल पडोळे यांना विद्यार्थ्यांना वाचन करताना बघून आनंद व्यक्त केला. लहान बालके प्रगत आहेत काय याची चाचणीपण घेतली. मुलांना अंकगणिताची ओळख आहे काय, पाढे म्हणतात काय, भाषेचे वाचन करताना काय, याबाबत प्रत्यक्ष जाणून घेण्यात आले. पुस्तकांचे वाचन करताना कोणती पुस्तक वाचताय याचे नाव व थोडक्यात माहिती समजून घेतली. मुलांना प्रश्नोत्तरीही विचारले.
शिवाय मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना केले. ज्ञान रचनावाद प्रक्रियेमुळे विद्यार्थी शैक्षणिक हक्क विकसीत होत असल्याचे त्यांनी बोलून दाखविले. मुलांच्या प्रगतीसबंधी भरभरून प्रशंशा केली. यावेळी मोहगाव देवी, जि.प केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा सेलोकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता समर्थ यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

पदाधिकारी आलेच नाही
क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी अधिकतर जिल्हा परिषदेच्याच शाळांना भेटी दिल्या. शाळांच्या विविध समित्यांचे पदाधिकारी शाळेच्या कार्यक्रमात फिरकले नाही. पं.स., जि.प. पदाधिकारीही कुठे गेले नाही. या वाचन प्रेरणा कार्यक्रमात लोकसहभागाचा वाटा दिसत नव्हता.
वाचनाची पुस्तके खरेदीसाठी जिल्हा परिषद शाळांना निधी देण्यात आले. अनुदानित खाजगी शाळांना वगळण्यात आले. हा भेदाभेद का यावर खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांना प्रश्न पडला आहे.

Web Title: Students, make books your friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.