शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

मुरलीत अनुसया ठरली विद्यार्थ्यांची ‘माय’

By admin | Updated: March 23, 2017 00:22 IST

सासर आणि माहेर गावाची सांगड घालत विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी तिने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मायेचा आधार दिला.

लोकमत शुभवर्तमान : विद्यार्थ्यांसाठी ‘माये’चा लढा, गावाच्या विकासाकरिता आर्थिक मदतरंजित चिंचखेडे चुल्हाड (सिहोरा) सासर आणि माहेर गावाची सांगड घालत विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी तिने विद्यार्थ्यांच्या डोक्यावर मायेचा आधार दिला. एक वेळ उपाशी राहा, परंतु शिक्षणाची कास धरा. असा संदेश अशिक्षित या वयोवृद्ध मायेने दिला. अन् तिचा लढा ही सुरु झाला. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्काराचे असंख्य लेकराची माय मुरली या लहानशा खेडेगावात चर्चेत आली. विद्यार्थ्यांनी तिला माय अशी उपाधी दिली. अनुसया पारधी असे या मायेचे नाव आहे.रोजगाराचा अभाव असणाऱ्या मुरली गावात अनुसया पारधी यांचा जन्म झाला. काही अंतरावरील येरली गावात तिचे सासर गाव झाले. परंतु माहेर गावात असणारी आस तिने सोडली नाही. सामान्य परिवारात वाटचाल सुरु असताना समाजाला काही देणे असल्याची जाणीव अनुसयाबाईला होती. विद्यार्थी देशाचे उज्वल भवितव्य आहे, असा संदेश या अशिक्षित मातेने दिला. अनुसया बाईंनी आधी मुरली गावात जिल्हा परिषदेची शाळा बांधकामासाठी स्वत:च्या शेतीची जागा दान दिली. या जागेवर शाळेचे बांधकाम होताच तिच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. पतीचे निधन झाल्यानंतर त्या खचल्या नाहीत. अशिक्षित असतानाही त्यांना गावातील मुले अधिकारी झाले पाहिजे, अशी जिद्द होती. आपल्या मृत्यूनंतर सर्वकाही इथेच सोडून जायचे आहे, ही जाणीव अनुसयाबाईला होती. गावात शाळेची सुसज्ज इमारत उभारण्यात आली. जागेची देणगी देऊन त्या थांबल्या नाही. मायेची ऊब देण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला. शरीर थकले असतानाही पैपै गोळा केले. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कपडे व पुस्तके भेट दिली. एकाच शाळेत तीन प्रकारचे गणवेश देणारी मुरलीची शाळा चर्चेत आली. डिजीटल शाळा उभारणीत अनुसयाबाई आर्थिक मदत घेऊन धावून आली. लेकरांना काही कमी पडू देणार नाही, अशी तिची धारणा झाली. दरवर्षी ही माय विद्यार्थ्यांसाठी आर्थिक मदत करीत आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणानंतर स्पर्धेचा काळ आहे. मोठ्या संघर्षाची वाटचाल असल्याने स्पर्धा परीक्षांचे संस्कार रूजविण्यासाठी पुस्तके खरेदीसाठी आर्थिक मदत दिली. या शाळेत स्पर्धा परीक्षाचे वाचनालय सुरु झाले. गावात स्वच्छता आणि पिण्याचे पाणी शुद्ध असायला पाहिजे. याकरिता अनुसयाबाईंने जनजागृती केली. गावातील विहिरीचे तोंडी बांधकामासाठी आर्थिक मदतीचा हात दिला. देवस्थानचा जिर्णोद्धार करण्यासाठी मदत दिली. विद्यार्थी आणि दीन दुबळ्याची माय म्हणून गावात वावरत असताना सत्काराची अपेक्षा केली नाही. विद्यार्थ्यांनी दिलेली ‘माय’ ही उपाधी मोठी असल्याचे ती सांगते. मुरली गावात जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी आले. अनुसयाबाईची गाथा एैकून ते भारावले. आपल्या मार्गदर्शनात या मातेचा गौरव केला. अनुसयाबाईंचा शाल श्रीफळ देऊन त्यांनी सत्कार केला. या सत्काराने अनुसयाबाई भारावल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना आशीर्वादाचे हात जोडून नमस्कार केला.