विद्यार्थ्यांनी केली डासअळी नष्ट

By Admin | Updated: September 4, 2015 00:11 IST2015-09-04T00:11:08+5:302015-09-04T00:11:08+5:30

प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला अंतर्गत गांधी विद्यालय सावरला, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय भोजापूर, प्रबुद्ध विद्यालय कन्हाळगाव, गणेश विद्यालय भेंडाळा ...

Students destroyed the daisy | विद्यार्थ्यांनी केली डासअळी नष्ट

विद्यार्थ्यांनी केली डासअळी नष्ट


पवनी : प्राथमिक आरोग्य केंद्र सावरला अंतर्गत गांधी विद्यालय सावरला, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय भोजापूर, प्रबुद्ध विद्यालय कन्हाळगाव, गणेश विद्यालय भेंडाळा येथील विद्यार्थ्यामार्फत घरोघरी जावून साठविलेली पाण्याची भांडी तपासून डेंगू डास अळी नष्ट करण्यात आली. तसेच ज्या विद्यार्थिनीं जास्त डेंगू डास अळी शोधल्या अशा तीन विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र सावरलातर्फे शाळेमध्ये बक्षिस देण्यात आले.
सदर मोहिम तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास मेश्राम यांच्या मार्गदर्शनात वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक बोदलकर, डॉ. अजय बुजाडे, डॉ. संदीप येळणे, आरोग्य सहायक देवराव लुचे, चंद्रमणी मेश्राम, नंदा चंद्रीकापुरे, आरोग्य सेवक प्रदीप खोत, सुधीर मेश्राम, आरोग्य सेविका निर्मला गावंडे, प्रतिभा भुरे, मंदा बावणे, प्रणाली ढवळे, कविता जाधव, सुरमन धुर्वे, दिपाली ढवळे, कविता जाधव, सुरमन धुर्वे, दिपाली पडोळे, प्रणीता येळणे, योगिनी देवगडे, औषधी निर्माता अधिकारी मिनाक्षी सुपारे, आरोग्य सेविका मनोहर बन्सोड, पार्बता बावणे, अनिल सोनकुसरे, उमेश कोल्हे, होमराज भाजीपाले यांनी राबविली. सदर मोहिम यशस्वी करण्याकरिता शाळेचे मुख्याध्यापक सर्वेश्री अशोक पारधी, दुबे, धारगावे, डोये तसेच शिक्षकवृंद यांनी विशेष सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Students destroyed the daisy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.