मतदान जनजागृतीत विद्यार्थ्यांचा सहभाग

By Admin | Updated: October 13, 2014 23:19 IST2014-10-13T23:19:05+5:302014-10-13T23:19:05+5:30

एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा जिल्हा (७२.२१ टक्के) मतदानाच्या टक्केवारीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती

Student participation in Voting Public | मतदान जनजागृतीत विद्यार्थ्यांचा सहभाग

मतदान जनजागृतीत विद्यार्थ्यांचा सहभाग

भंडारा : एप्रिल महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भंडारा जिल्हा (७२.२१ टक्के) मतदानाच्या टक्केवारीत राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होता. यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जनजागृती अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत लाखांदूर येथील यशवंतराव चव्हाण महविद्यालयाचा विद्यार्थी आशिष ठाकरे हा अव्वल ठरला.
जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांच्या मार्गदर्शनात या स्पर्धांचे निकाल जाहिर करण्यात आले. या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाच्या निबंधाचा हा काही अंश...
मतदान आवर्जुन करा
निवडणुकीची रणधुमाळी ंअंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक पक्षाकडून प्रचार शिगेला पोहोचला आहे. काहीही करून जिंकून यायचे वेड प्रत्येकच उमेदवाराला लागले आहे. परंतु मतदारांनी न चुकता मतदान करावी, अशी अपेक्षा आहे. सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे खोट्या प्रचाराला बळी न पडता आपले अमूल्य मत, कर्तबगार व्यक्तीला द्या. कारण एखादा उमेदवार क्षेत्राचा उद्धार करू शकतो. अशाच माणसाच्या हाती राज्याची धुरा दिली पाहिजे, असे माझे मत आहे. महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सत्ता मिळवायची परंतु ते विचार रुजविण्याचा प्रयत्न कोणताही पक्ष करीत नाही. गांधीजींच्या तत्वांचा आणि घटनात्मक मुल्यांचा जीवनात आग्रह धरलेला नाही. त्यामुळे आपले हक्क आणि कर्तव्य काय आहेत. तेच आपल्याला कळत नाही. माणसाने पुस्तक वाचले तर त्याचे मस्तक सुधारते आणि सुधारलेले मस्तक कुणासमोरही नतमस्तक होत नाही. हा वसा आम्ही लक्षात घेतला पाहिजे. आज मतदान करणे गरजेचे आहे. यासाठी प्रशासनदेखील प्रयत्न करीत आहे परंतू काही ठिकाणी अजूनही ३५-४० टक्केच मतदान होत आहे. मतदान करणारा मतदार जर संघटीत होऊन, एकत्रित येऊन आणि विचार करून मतदान करत असेल तर तो या देशात निर्माण होणाऱ्या समस्या सट्टा, जुगार, दारू, भ्रष्टाचार, बलात्कार, महागाई, हुंडाबळी, महिलांवरील होणारे अत्याचार या गोष्टी थांबविणे हे मतदारांच्या हातात आहेत. सुजान मतदार हाच देशाला सुजलाम, सुफलाम करु शकतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे ‘शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तरच उद्याचा उष:काल तुमच्या हातात आहे’ अन्यथा नाही. बाबासाहेबांनी पुन्हा म्हटले होते की ‘गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या. तेव्हाच तो बंड करून उठेल’.
गुलामाला त्याच्याविरूद्ध होणाऱ्या अन्यायाची माहिती मिळाली तर तो अन्यायाविरूद्ध लढू शकतो, असे मला वाटते.

Web Title: Student participation in Voting Public

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.