भरधाव ट्रकने वृद्धेला चिरडले

By Admin | Updated: December 19, 2015 00:25 IST2015-12-19T00:25:57+5:302015-12-19T00:25:57+5:30

रस्ता ओलांडत असलेल्या एका ६२ वर्षीय वृद्धेला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

Studded truck crushed the old man | भरधाव ट्रकने वृद्धेला चिरडले

भरधाव ट्रकने वृद्धेला चिरडले

टाकळी येथील घटना : संतप्त जमावाने ट्रक चालकाला बदडले
भंडारा : रस्ता ओलांडत असलेल्या एका ६२ वर्षीय वृद्धेला भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. कौशल्या नामदेव रहाटे रा. टाकळी असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास भंडारा-वरठी मार्गावरील टाकळी येथे घडली.
कौशल्या रहाटे ही महिला सकाळच्या सुमारास प्रातविधीसाठी रस्ता ओलांडत असताना भंडाराहुन वरठीकडे जाणाऱ्या ट्रक एमएच २६ एडी ८५१६ ने महिलेला जबर धडक दिली. यात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती होताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघाताची भीषणता बघून संतप्त जमावाने ट्रक चालकाला चांगलेच बदडले. घटनेची माहिती भंडारा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. तपास पोलीस निरीक्षक जयवंत चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक आर.पी. गायकवाड करीत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Studded truck crushed the old man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.