जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:47+5:302021-04-08T04:35:47+5:30
मोहाडी येथे संपूर्ण बाजारपेठ बंद होती. परंतु तालुक्यातील जांब, कांद्री यासह काही गावातील दुकाने सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, ...

जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद
मोहाडी येथे संपूर्ण बाजारपेठ बंद होती. परंतु तालुक्यातील जांब, कांद्री यासह काही गावातील दुकाने सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी रुट मार्च काढण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, राखीव दलाचे जवान यांच्या उपस्थितीत हा मार्च काढण्यात आला. लाखनी येथेही संपूर्ण बाजारपेठ बंद होती.
या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. परंतु काही लहान व्यापारी याबाबत नाराजी व्यक्त करीत असल्याचे दिसत होते. लाखांदूर, साकोली येथेही व्यापाऱ्यांनी बंद ठेवून कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य केले. शहरी भागात संपूर्ण बाजारपेठ बंद असली तरी ग्रामीण भागातील लहान दुकाने आणि काही व्यवसाय सुरू असल्याचे दिसून येत होते.