कडक निर्बंध लावा, पण व्यापार सुरू ठेवा: सर्व स्तरातून मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:37 IST2021-04-09T04:37:08+5:302021-04-09T04:37:08+5:30
जनतेच्या बेलगाम वागण्यामुळे सध्या कोरोनाचा कहर वाढतच आहे. जनतेला कितीही सांगितले तरी जोपर्यंत स्वतःवर बितत नाही, तोपर्यंत त्यांना ...

कडक निर्बंध लावा, पण व्यापार सुरू ठेवा: सर्व स्तरातून मागणी
जनतेच्या बेलगाम वागण्यामुळे सध्या कोरोनाचा कहर वाढतच आहे. जनतेला कितीही सांगितले तरी जोपर्यंत स्वतःवर बितत नाही, तोपर्यंत त्यांना याचे गांभीर्य कळत नाही, हे सर्वविदित आहे. यासाठी कडक निर्बंधाचीच आवश्यकता असते. फक्त व्यावसायिक दुकाने बंद करून कोरोनावर मात देणे शक्य नाही. उलट यामुळे छोटे दुकानदार, हात ठेलेवाले, यांचे मरण होईल. शासनाला कर रूपात जाणारा महसूल बुडेल. त्यापेक्षा यंत्रणेला सशक्त करून जनतेला नियम पाळण्याची सक्ती केल्यास, कोरोना चाचणी केंद्राची संख्या वाढविल्यास या रोगावर नियंत्रण मिळविता येईल, असे जाणकारांचे मत आहे.
बाजारपेठा सुरू करून प्रत्येक दुकानदारांना नियम पाळण्याचे बंधने घालून दिल्यास आता सर्व दुकानदार काटेकोरपने नियम पाळतील, असे सर्वांचे एकमत आहे. त्यामुळे शासनाने रोजगारावर गदा न आणता यातून पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी मोहाडी येथील विविध व्यापारी संघटना व प्रतिष्ठित नागरिकांतर्फे शासनाला करण्यात आली आहे.