राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करा
By Admin | Updated: September 19, 2015 00:41 IST2015-09-19T00:41:42+5:302015-09-19T00:41:42+5:30
भाजपच्या शासन काळात जनतेचे कसे वाटोळे केले जात आहे याची माहिती जिल्ह्यातील सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याकरिता राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबुत करण्याची गरज आहे,..

राष्ट्रवादीचे संघटन मजबूत करा
राष्ट्रवादी काँग्रेसची सभा : मधुकर कुकडे यांचे प्रतिपादन
तुमसर : भाजपच्या शासन काळात जनतेचे कसे वाटोळे केले जात आहे याची माहिती जिल्ह्यातील सामान्य माणसापर्यंत पोहचविण्याकरिता राष्ट्रवादी पक्षाचे संघटन मजबुत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी केले.
तुमसर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी मंचकावर जिल्हा राष्ट्रवादी युवती अध्यक्षा कल्याणी भुरे, राजेश देशमुख, सरोज भुरे, उषा जावळे, पमा ठाकूर, संजय केवट, देवचंद ठाकरे उपस्थित होते.
कुकडे म्हणाले, भाजपाचे शासन हे केवळ घोषणा करणारे शासन असून वाढलेली महागाई व शेतकऱ्यांचे वाढलेले प्रमाण बघून दिसून येते, असे सर्व असताना देखिल शासनाचा खोटारडेपणा जनतेसमोर मांडण्याकरिता प्रसार व प्रचार करण्याची वेळ आली आहे. करिता कार्यकर्त्यांनी शेवटच्या मानसापर्यंत पोहचून त्यांच्या समस्या निकाली काढा, असे आवाहनही पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेला संबोधिताना केले.
सभेला सुरूवात होण्यापुर्वी दिवंगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत उके यांना श्रद्धांजली अर्पण केली. सभेचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनी मांडले तर संचालन घनश्याम गुप्ता यांनी तर उपस्थितांचे आभार नितु शर्मा यांनी मानले.
सभेत निशिकांत पेठे, अंकुर ठाकूर, तिलक गजीिये, असलम पटेल, राजेंद्र तुरकर, रामकृष्ण उकरे, सलाम तुरक, विजया चोपकर, कविता साखरवाडे, चंदा धार्मिक, मिना गाढवे, संजय चोपकर, शाम भैरम, राकेश धार्मिक, नाविन गौरी, निशिध वर्मा, प्रवीण कामथे, अर्शद मिर्जा, मनीष लांजेवारसह असंख्य वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)