Strengthen ideas for enlightenment through meetings | संमेलनातून विचार प्रबोधनाला बळ
संमेलनातून विचार प्रबोधनाला बळ

ठळक मुद्देसुषमा भड : पवनी येथे परिवर्तन साहित्य संमेलनाचे उद्घाटन, अनेक साहित्यिकांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : फुले, शाहू, आंबेडकर या थोरपुरुषांच्या प्रेरणादायी विचारांमुळे ओबीसी महिला जागृत झाल्या आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनआंदोलनाला वेगळा आयाम दिला. त्यांनी मानवतावादास प्राधान्य देऊन अनेकांना हादरे दिले. या परिवर्तन साहित्यामधून माणसे घडून विचार प्रबोधनाला बळ मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महिला संघाच्या अध्यक्षा सुषमा भड यांनी केले.
परिवर्तन विचार मंच द्वारा शासन रश्मी परिसर गांधी भवन पवनी येथे आयोजित पहिल्या मुक्त प्रतिनिधी परिवर्तन साहित्य संमेलनातून ना. रा. शेंडे सभागृहात स्मृतीशेष डॉ. वा. ना. मेश्राम प्रज्ञा मंचावरुन उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या.
संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. विनोद मेश्राम होते. यावेळी स्वागताध्यक्ष नगराध्यक्ष पुनम काटेखायेच तर प्रमुख अतिथी म्हणून परिवर्तन विचार मंचचे अध्यक्ष विलास गजभिये, कार्याध्यक्ष शालीक जिल्हेकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे पर्यटन विभाग प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, अखिल भारतीय भिक्कू संघाचे संघानुशासक भदंत सदानंद, भंदत ज्ञानबोधी थेरो, प्रा. भीमराव गायकवाड, पत्रकार मिलींद फुलझेले, मनोहर मेश्राम, पुनम हटवार आदी उपस्थित होते.
साहित्यिकांचे ऐतिहासिक पवनी शहरात आगमन होताच वाजत गाजत गांधी चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात रॅली काढण्यात आली. रॅली संमेलनस्थळी पोहचल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पुजन करुन संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी अनेक साहित्यीकांच्या पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करुन सपत्नीक शाल, स्मृतीचिन्ह, साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विलास गजभिये, पुनम काटेखाये, यांनी मार्गदर्शन केले. डॉ.प्रियदर्शी खोब्रागडे यांनी पवनीतील प्राचीन बौद्धस्तुपावर मार्गदर्शन केले.
संमेलनाचे अध्यक्ष प्रा.विनोद मेश्राम यांनी साहित्य संमेलन हा आरसा असून पवनीतील परिवर्तन साहित्य संमेलन हे समाजाला नवीन दिशा देणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक मनोहर मेश्राम यांनी केले. संचालन कवी संजय गोडघाटे व आभार प्रदर्शन लक्ष्मीकांत तागडे यांनी केले. स्वागत गीत आठल्ये यांच्या मार्गदर्शनात वैनगंगा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थींनीनी गायले. संमेलनात विदर्भातून मोठ्या संख्येने साहित्यीक सहभागी झाले होते.

Web Title: Strengthen ideas for enlightenment through meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.