कथेने माणसातील माणूसपण जगणे शिकविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:57 IST2021-05-05T04:57:45+5:302021-05-05T04:57:45+5:30

अर्जुनी-मोरगाव : कथा ही माणसाला आकार देते, जगणे शिकविते, तसेच मन जुडविते. कथा ही माणसाची कहाणी असते, कथेने ...

The story taught us to live in human beings | कथेने माणसातील माणूसपण जगणे शिकविले

कथेने माणसातील माणूसपण जगणे शिकविले

अर्जुनी-मोरगाव : कथा ही माणसाला आकार देते, जगणे शिकविते, तसेच मन जुडविते. कथा ही माणसाची कहाणी असते, कथेने समाजाचे वास्तव चित्र मांडत असणे आणि माणसाचे माणूसपण असे जगणे शिकविते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी, लेखक व कथाकार प्रा. डॉ. अनंता सूर यांनी केले. ते ऑनलाइन कथाकथनाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळेस गोव्याच्या प्रसिद्ध कवयित्री चित्रा क्षीरसागर यांनी उद्घाटन केले. तसेच सहभागी कथाकार म्हणून सीमा भसारकर, शशिकला मदनकर, संगीता धोटे, छाया जांभुळे, प्रियंका ठाकरे, मंजूषा साखरकर आदी सहभागी झाल्या होत्या. लोककला साहित्य सेवाभावी बहुउद्देशीय संस्था, येरंडी - बाराभाटी संचालित परिवर्तनशील साहित्य महामंडळ महाराष्ट्र राज्य व गोवा यांच्या सौजन्याने हे ऑनलाइन कथाकथन घेण्यात आले. विविध विषयांच्या सामाजिक, शैक्षणिक, भावगर्भ, चित्तथरारक अशा कथांचे सादरीकरण झाले. ऑनलाइन कथाकथनाचे संचालन मुन्नाभाई नंदागवळी यांनी केले. डाॅ. सुकेशिनी बोरकर यांनी आभार मानले.

Web Title: The story taught us to live in human beings