कथा ही सदैव आपल्या सोबतच असते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:31 IST2021-04-05T04:31:32+5:302021-04-05T04:31:32+5:30
भंडारा : कथा ही आपल्या जगण्याबरोबरच जन्मते आणि आपणासोबतच रात्री निद्रेच्या अधीन होते. कथा भूतकाळात होती, भविष्यातही असेल आणि ...

कथा ही सदैव आपल्या सोबतच असते
भंडारा : कथा ही आपल्या जगण्याबरोबरच जन्मते आणि आपणासोबतच रात्री निद्रेच्या अधीन होते. कथा भूतकाळात होती, भविष्यातही असेल आणि वर्तमानातसुद्धा सोबतच आहे, असे प्रतिपादन डॉ. विजया मारोतराव यांनी केले.
त्या काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित ‘कथा कशी स्फुरते?’ व ‘पडद्यामागील व पडद्यावरील तान्हाजी’ या ऑनलाईन व्याख्यानांच्या मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या. गुगल मीटद्वारे झालेल्या सदर कार्यक्रमाचे नागपूरच्या सुप्रसिद्ध कथालेखिका, साहित्यिक, व्याख्यात्या डॉ. विजया मारोटकर यांनी उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या वंशज डॉ. शीतल मालुसरे होत्या. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद घोडके, महासचिव कालिदास चवडेकर, सहसचिव दीपक सपकाळ, व्याकरण मंचचे अध्यक्ष चारुदत्त मेहरे व संस्थेचे राज्य पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती. ‘कथा कशी स्फुरते?’ या व्याख्यानाचे प्रथम पुष्प गुंफताना त्यांनी कथेविषयीच्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी डॉ. शीतल मालुसरे यांनी ‘शिवरायांची सावली बनून जगणारा त्यांचा सखासोबती मावळा तान्हाजी हा अफलातून खरा शूरवीर योद्धा होता.’ अशा स्फूर्तिदायक व ऐतिहासिक प्रसंगाचे दाखले देत सहभागी रसिकांना मंत्रमुग्ध केले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन काव्यप्रेमी नागपूर विभागाच्या अध्यक्षा कविता कठाणे यांनी केले होते. स्वागतगीत पूनम डहाके यांनी तर संचालन डॉ. जयश्री सातोकर व मंगला डहाके यांनी केले. प्रास्ताविक कविता कठाणे यांनी तर आभार किशोर चलाख यांनी मानले. कार्यक्रमात निशा खापरे, विजेता चन्नेकर, स्वाती रुद्र, कविता दाते, प्रगती सोनटक्के, निरज अत्राम उपस्थित होते.