वादळी पावसामुळे शेतकरी अडकला चक्रव्यूहात

By Admin | Updated: March 6, 2016 00:12 IST2016-03-06T00:12:23+5:302016-03-06T00:12:23+5:30

जिल्ह्यात २६ व २९ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह अकाली पावसाने हजेरी लावली.

Stormy rains cause farmers to enter the cyclone | वादळी पावसामुळे शेतकरी अडकला चक्रव्यूहात

वादळी पावसामुळे शेतकरी अडकला चक्रव्यूहात

शेतकरी हवालदिल : कृषी विभाग म्हणतो, नुकसान नाही आणि खासदार म्हणतात, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्ह्यात २६ व २९ फेब्रुवारी रोजी वादळी वाऱ्यासह अकाली पावसाने हजेरी लावली. पावसाच्या तडाख्याने रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असताना कृषी विभाग नुकसान निरंक असल्याचे सांगत आहे. तर, खासदार नाना पटोले नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची मागणी करीत आहे. यावरुन शेतकरी हा शासन व प्रशासनाच्या चक्रव्युहात कसा अडकतो, याचे हे ज्वलंत उदाहरण म्हणावे लागेल.
भंडारा जिल्ह्यात मागील शुक्रवारी व सोमवारी अकाली पावसाने अवकाळी हजेरी लावली. या शेतकरी हताश झाला आहे. उडीद, मुग, लाख, लाखोळी, वाटाना, हरभरा, गहू आदी रबी पिकांच्या कापणीचा हंगाम जोमात सुरु आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात या रब्बी पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत. काहींचे या पिकांचे ढिग जमा झाले आहेत. दोन दिवस अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे शेतात पसरलेल्या कडपा आणि जमा झालेल्या ढिगांमध्ये पाणी शिरले असून ही पिके सडण्याच्या मार्गावर आहेत. जमा झालेल्या पिकांच्या ढिगांवर पॉलीथीन, ताडपत्री झाकून पिक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. तरीही पिकामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. अकाली पावसाने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावून घेतल्यामुळे शेतकऱ्यांचे 'टेंशन' वाढले आहे. असे असतानाही कृषी खात्याचे अधिकारी जिल्ह्यात पिकाचे नुकसान नाही, असे सांगत आहेत.
विजेच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पवनी तालुक्यातील खैरी दिवाण शेतशिवारात वीज कोसळून २२ शेळ्यांचा मृत्यू झाला. घरावरचे छत उडाले. विटाभट्ट्याचे अनेकांचे नुकसान झाले. मात्र कृषी विभाग रबी पिकाचे नुकसान झालेले नाही. नुकसान निरंक आहे, असे म्हणणे तर्कसंगत नाही.

४३ हजार हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी
यावर्षी कृषी विभागाने ४५,११५ हेक्टर क्षेत्र रबी पिकांसाठी निर्धारित केले. शेतकऱ्यांनी ९५.१२ टक्के पेरणी पूर्ण केलीे. ४२,९११ हेक्टर क्षेत्रात रबीची पेरणी करण्यात आली. यामध्ये १२२.४१ टक्के लाखोळी तर १४० टक्के तीळ पिकाची लागवड करण्यात आली. ११० टक्क्यामध्ये हरभरा तर ८७ टक्क्यांमध्ये गव्हाची पेरणी झाली. मात्र वातावरण बदल व अकाली पावसाामुळे रबी पीके धोक्यात असून शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला आहे.

भंडारा जिल्ह्यात दोन दिवस पावसाने हजेरी लावली. मात्र शेतपिकाचे नुकसान झालेले नाही. तालुकास्तरावरुन नुकसान झाले नसल्याचे तालुका कृषी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. नुकसान निरंक आहे.
- नलिनी भोयर
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

Web Title: Stormy rains cause farmers to enter the cyclone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.