दर्शनी भागात खताचा फलक साठा लावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:35 IST2021-04-01T04:35:57+5:302021-04-01T04:35:57+5:30
शेतकरी वर्गांना खते खरेदी करताना अडचण जाऊ नये. शासनाने पुरवून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून खताची विक्री करण्याकरिता निविष्ठा धारक ...

दर्शनी भागात खताचा फलक साठा लावा
शेतकरी वर्गांना खते खरेदी करताना अडचण जाऊ नये. शासनाने पुरवून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून खताची विक्री करण्याकरिता निविष्ठा धारक व शेतकऱ्यांना सोयीचे होईल. तालुक्यात काही ठिकाणी खत असूनही निविष्ठा धारक शेतकऱ्यांना युरिया खत पुरवित नसल्याच्या तक्रारी मिळालेल्या आहेत. अशा प्रसंगी कृषी निविष्ठा धारकांना स्पष्ट सूचना आहेत. उपलब्ध असलेल्या कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना निर्धारित दरात पुरवा.
शेतकरी बांधवांनी सुद्धा स्वतःचा आधार नंबर सोबत घेत कृषी निविष्ठा धारकांना पास मशीन द्वारे खत विक्री करण्याकरिता सहकार्य करावे. जेणेकरून कृषी निविष्ठा धारकांकडे उपलब्ध असलेले खत वरिष्ठ स्तरावरील कार्यालयाला माहितीकरिता सोयीचे होईल. बरेच शेतकरी आधार नंबर न घेता खताची खरेदी करतात. परंतु अशाने कृषी निविष्ठा धारक संकटात सापडतात. तेव्हा प्रत्येकाने आपापली बाजू कायद्याच्या चाकोरीत ठेवून खत खरेदी करावा. अशा स्पष्ट सूचना तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आलेले आहेत.