फसलेला ट्रक काढण्यासाठी थांबला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 05:01 IST2020-06-18T05:00:00+5:302020-06-18T05:01:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मोहाडी : रेतीचा ट्रक काढण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागला. बऱ्याच शर्थीने ट्रक नालीच्या बाहेर निघाला खरा ...

Stopped road to remove the wrecked truck | फसलेला ट्रक काढण्यासाठी थांबला रस्ता

फसलेला ट्रक काढण्यासाठी थांबला रस्ता

ठळक मुद्दे अखेर ट्रक ताब्यात : मोहाडी तालुक्यातील सर्व तलाठी दहेगावात उपस्थित

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : रेतीचा ट्रक काढण्यासाठी मोठा आटापिटा करावा लागला. बऱ्याच शर्थीने ट्रक नालीच्या बाहेर निघाला खरा पण यासाठी रस्त्याची रहदारी काही वेळ थांबविण्यात आली होती.
रेती चोरून नेणाऱ्या ट्रकला नायब तहसीलदार यांच्या पथकाने पकडले. पण, ट्रक चालकांनी वाहन महसूल विभागाच्या ताब्यात जाऊ नये यासाठी ट्रक नालीत घातला. जीवाची पर्वा न करता चालक चालत्या ट्रक मधून पळाला होता. तो रूतलेला ट्रक काढण्यासाठी नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे यांनी काही यंत्र बोलावले होते. रात्रीच्या नऊ वाजतापर्यंत ट्रक काढण्याचा खटाटोप केला गेला. त्या ठिकाणी कोतवाल चंदन नंदनवार, दहेगावचे पोलिस पाटील सुरेश सेलोकर यांना ट्रकच्या शेजारी तहसीलदार यांच्या गाडीत रात्रभर जागत राहिले. सकाळी पुन्हा रूतलेला ट्रक काढण्याचा अभियान सुरू झाला. सकाळी ट्रकमधून रेती रिकामी करण्यात आली. जेसीबी बोलावली गेली. ट्रकचे स्टेअरिंग लॉक करण्यात आले होते. पुन्हा आटापिटा सुरू झाला. पण त्या अडचणींवर मात करण्यात आली. दुपारी दोन वाजता तो ट्रक काढण्यात यश मिळाले. तो ट्रक पोलीस ठाणे मोहाडीच्या ताब्यात देण्यात आले. ट्रक काढताना काही वेळ रस्ता थांबविण्यात आला होता. यावेळी वाहनांची रीघ लागली होती. यावेळी तालुक्यातील सर्व तलाठ्यांना दहेगाव येथील घटनास्थळावर बोलावण्यात आले होते.

ट्रक मालकांवर दंड करण्याचे प्रकरण तहसीलदार यांच्याकडे दिले आहे. एक नोटीस काढून त्याला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. नंतरच दंडाचे आदेश काढले जातील.
-घनश्याम सोनकुसरे, नायब तहसीलदार, मोहाडी.

Web Title: Stopped road to remove the wrecked truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.