शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लाखनीत रास्ता रोको

By Admin | Updated: October 20, 2015 00:41 IST2015-10-20T00:41:43+5:302015-10-20T00:41:43+5:30

तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केसलवाडा (पवार) सालेभाटा येथून..

Stop the way for farmers' demand | शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लाखनीत रास्ता रोको

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी लाखनीत रास्ता रोको

सर्वपक्षीय आंदोलन : सालेभाटा ते लाखनी पदयात्रा
लाखनी : तालुक्यातील लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केसलवाडा (पवार) सालेभाटा येथून लाखनीपर्यंत शेतकऱ्यांची पदयात्रा, मोर्चा व रास्ता रोको आंदोलन जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
सोमवारी सकाळी ८ वाजतापासून केसलवाडा व सालेभाटा व लाखोरी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पदयात्रा व मोर्चा काढला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे, नापिकीमुळे शेतकऱ्यांना २५ हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई द्यावी, दरवर्षी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना १० हजार रुपये बोनस द्यावा, शेतकऱ्यांना २०० लिटर डिझेल अर्ध्या किमतीत उपलब्ध करून द्यावा, १९९२ चे धानाचे भाव ग्राह्य धरून दरवर्षी १० टक्के भाव वाढ करून देणे, इंग्रजकालीन आणेवारी पद्धत पुर्णपणे नष्ट करण्यात यावे, शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, गावपातळीवर माती, परीक्षण व फुड टेस्टींग व्हावी, सेंद्रीय शेतीसाठी विशेष तरतूद करावी, जलयुक्त शिवार योजनेत सालेभाटा गावाची निवड करावी, वैनगंगा नदीचे पाणी लिफ्ट इरिगेशनद्वारे सालेभाटा परिसरात पोहचविणे, शेतकरी व शेतमजुरांना सरसकट पेन्शन योजना राबविणे, दुधाचे दर वाढवून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांना पंपासाठी केरोसिन उपलब्ध करून द्यावे, मनरेगा अंतर्गत शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना मजुरांसाठी एकरी पैसा पुरविण्यात यावी या मागण्यांचे निवेदन तहसीलदार डी.सी. बोंबर्डे यांना देण्यात आले. दुपारी १ वाजता तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको करण्यात आला. याप्रसंगी माजी आमदार सेवक वाघाये, अशोक चोले, नूतन ठाकरे, सुनील पटले, श्यामसुंदर देशमुख, सुरेश बोपचे, प्रदीप रहांगडाले, थेडीलाल रहांगडाले, सुखदेव नागलवाडे, एकनाथ बघेले, दिवाकर वाघमारे, सुदर्शन वाघमारे, सुनील बांते, उज्ज्वला जनबंधू, माया अंबुले, धनंजय ठाकरे, दशरथ येळे, उदेभान टेंभुर्णे, संजय रहांगडाले, कुंडलीक रहांगडाले, पुरुषोत्तम राणे, भास्कर जांभुळकर, लालचंद रहांगडाले, गिरीश बावनकुळे, निरज टेंभुर्णे आदीसह सरपंच, उपसरपंच व सर्वपक्षीय नेते, शेतमजुर पदयात्रेत सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Stop the way for farmers' demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.