बसफेरीसाठी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 22:25 IST2018-08-06T22:24:57+5:302018-08-06T22:25:14+5:30
बसफेरीच्या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा लाखांदूर व शालेय विद्यार्थ्यांनी संबंधित विभागाला दोन, तिन वेळा निवेदन सादर केले होते. मागण्या पूर्ण न झाल्याने सोमवारला सकाळी १० वाजतापासून सलग चार तास पवनी लाखांदूर मार्गावरील चुलबंद नदीकाठावरील शंकर मंदिरासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे.

बसफेरीसाठी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : बसफेरीच्या मागणीसाठी बहुजन रिपब्लिकन विद्यार्थी मोर्चा लाखांदूर व शालेय विद्यार्थ्यांनी संबंधित विभागाला दोन, तिन वेळा निवेदन सादर केले होते. मागण्या पूर्ण न झाल्याने सोमवारला सकाळी १० वाजतापासून सलग चार तास पवनी लाखांदूर मार्गावरील चुलबंद नदीकाठावरील शंकर मंदिरासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे. चार तास चक्का जाम असल्याने सर्वांचेच टेंशन वाढले होते.
लाखांदुरचे नायब तहसीलदार विजय कावळे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मेटकर, शहारे, आगार व्यवस्थापक शेंडे, गुणवंत तागडे, जि. प. सदस्य मनोहर राऊत, सरपंच संघटना अध्यक्ष जितू पारधी यांनी आंदोलनाला भेट देऊन विद्यार्थ्यांंच्या समस्या जाणून घेतल्या. पावसाने सुरवात केल्यानंतर ही आंदोलन चालु होते.
तालुक्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत पिंपळगाव कोहळी ते मडेघाट, कन्हाळगाव ते मेंढा चप्राड, रामा ३५४ ते सावरगाव, रामा ३५४ ते खैरीपट, रामा ३५४ आसोला ते मांदेड, रामा ३५४ परसोडी नाग ते कुडेगाव, रामा ३५४ ते रोहनी, दोनाड ते किरमटी, प्रजिमा ३९ घोडेझरी ते पालेपेंढरी, प्रजिमा ३८ सोनेगाव ते पेंढरी या रस्त्यांचे एकाचवेळी चालु करण्यात आले असून, कंत्राटदाराकडून कासवगतीने काम केले जात असल्याने हे रस्ते खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे लाखांदूर ते मोहरणा, लाखांदुर ते भागडी मार्ग धावणारी बससेवा बंद पडली असल्याने विद्यार्थ्यांंना शाळेला जाता येत नसून शैक्षणिक नुकसान होत आहे.
आंदोलना दरम्यान आगार व्यवस्थापक शेंडे व तागडे यांनी नियमीत बस फेरी चालु करण्याचे सांगितले व नायब तहसीलदार कावळे यांनी संबंधित विभागाला नादुस्त असलेल्या रस्त्यांचे तांत्काळ काम करण्यास सांगितल्यानंतर मोर्चेकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. आंदोलनात बिआरव्हिएमचे निशांत बडोले, शारूख पठान, त्रिलोक बडोले, आशिष गजभिये, अश्विन मोटघरे, पंकज नान्हे, निलेष मोटधरे, तरबेज पठान, मयुर ब्राम्हणकर, भरत गजापुरे, सुनिल कांबळे यांच्यासह डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, जि. प. हायस्कुल, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षण घेणारे चारसेच्या आसपास विद्यार्थ्यी उपस्थित होते. अनुचित घटना घडणार नाही, यासाठी पोलीस उपनिरीक्षक के. के. गेडाम यांच्या नेतृत्वात पोलीसांचा चोख बंदोबस्त होता.