शिवसेनेचा डोंगरीत रस्ता रोको
By Admin | Updated: June 8, 2017 00:20 IST2017-06-08T00:20:48+5:302017-06-08T00:20:48+5:30
९५ दिवसांपासून पीडित कुटुंबावर होत असलेल्या डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ तथा शेतकऱ्यांनी १५ मेपासून मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

शिवसेनेचा डोंगरीत रस्ता रोको
‘मॉयल’समोर आंदोलन : आंदोलनात पीडित कुटुंब सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : ९५ दिवसांपासून पीडित कुटुंबावर होत असलेल्या डोंगरी मॉईल प्रशासनाच्या विरोधात स्थानिक ग्रामस्थ तथा शेतकऱ्यांनी १५ मेपासून मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. तत्पूर्वी ५ मार्चपासून साखळी उपोषण सुरु केले. परंतु खाण प्रशासन पीडित कुटुंबाची दखल घेतली नाही. त्यामुळे शिवसेनेने खाणग्रस्त पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी बुधवारला आंदोलन केले.
यापूर्वी शिवसेनेने अधिकाऱ्यांशी चारवेळा चर्चा केली. ५ जूनपर्यंत खाणग्रस्त पीडित कुटुंबांच्या मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी दिले होते. परंतु मागण्या मान्य झाल्या नाही. मॉईलमध्ये ब्लास्टींगच्या दररोज झटक्यामुळे परिसरात राहत असलेल्या नागरिकांना खुप त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत. परिसरातील खाणग्रस्त पीडित कुटुंबाच्या पुनर्वसन सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे, मॉईल परिसरातील खाणग्रस्त पीडित कुटुंबांच्या जमिनी प्रकल्पात गेलेल्या पीडित कुटुंबाच्या नोकऱ्या देण्यात यावे, मॉईल मधील खाणग्रस्त पीडित कुटुंबाच्या शेतामधून जात असलेला दूषित पाणी थांबविण्यात यावे, जेणेकरून त्यांना शेती करता यावी, मॉईलचा उत्खननामुळे होत असलेल्या ढिग हे दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे, जेणेकरून सूर्यकिरण मिळून त्यांचे आरोग्य चांगले राहील व प्रदूषणमुक्त राहता येईल, या मागण्या पीडित कुटुंबांनी उपोषणस्थळी केल्या आहेत. यावेळी उपोषणस्थळी मॉईल अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते. परंतु मॉईल प्रशासनाने याची दखल न घेतल्यामुळे शिवसेनेने मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर चार तास रास्ता रोको करून गावकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, उपजिल्हा प्रमुख व पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, संदीप वाकडे, अमीत मेश्राम, तालुकाप्रमुख नरेश उचिबगले, किशोर चन्ने, उपतालुकाप्रमुख प्रकाश लसुन्ते, युवासेना उपजिल्हा प्रमुख मनोज चौबे, शिवसेना शहर प्रमुख नितीन सेलोकर, उपशहर प्रमुख जगदीश त्रिभुवनकर, वाहतूक सेना शहरप्रमुख किशोर यादव, उपशहर प्रमुख कृपाशंकर डहरवाल, दिलीप सिंगाडे, धर्मेंद्र धकेता, नरेश टेंभरेसह शिवसैनिक व पीडित ग्रामवासीयांनी मॉईलच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर शिवसैनिकांनी ‘जय भवानी जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. दरम्यान तहसीलदार गजेंद्र बालपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, पोलीस निरीक्षक नागरे आंदोलनस्थळी पोहचले आणि आंदोलनकर्त्यांना अटक करण्याचा प्रयत्न केला.