चिचोली येथे दीड तास रस्ता रोको
By Admin | Updated: December 29, 2016 02:04 IST2016-12-29T02:04:32+5:302016-12-29T02:04:32+5:30
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन-परिक्षेत्रांतर्गत चिचोली येथे मंगळवारला वनविकास महामंडळाला ‘आमचा गाव,

चिचोली येथे दीड तास रस्ता रोको
ग्रामस्थांचा पुढाकार : वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना निवेदन
पवनारा : तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वन-परिक्षेत्रांतर्गत चिचोली येथे मंगळवारला वनविकास महामंडळाला ‘आमचा गाव, आमचा जंगल’ देण्यास असमर्थता दर्शविली. याविरोधात शेकडो नागरिक रस्त्यावर उतरुन दीड तास रस्ता रोको आंदोलन केले. महामंडळाच्या कर्मचाऱ्याला निवेदन देण्यात आले. यावेळी तुमसर चे वनपरिक्षेत्राधिकारी जोशी उपस्थित होते.
आमचा गाव आमचा जंगल असून वनविकास महामंडळाला देण्यास नागरिकांनी असमर्थता दर्शविली आहे. जंगलात जनावरांना मुबलक चारा मिळतो. त्यामुळे येथील नागरिक गुरे व शेळीपालनाच्या व्यवसायावर उपजीविका चालवितात. तसेच येथील गोरगरीबांना जंगलातील वाळलेल्या सरपनाचा आधार मिळतो. कदाचित वनविकास महामंडळाला जंगल दिल्यास येथील नागरिकांना उपजीविकेचे कोणतेही साधन नाही. त्याकरिता उपसरपंच कृष्णकुमार रहांगडाले, कृउबास संचालक डॉ हरेन्द्र रहांगडाले, सदन चौधरी यांच्या पुढाकारातून गावकऱ्यांनी दीड तास रस्ता रोको आंदोलन केले.
ग्रामसभेच्या ठरावानुसार आपला गाव आपला विकास राहील, याबाबत ग्रामसभेत ठराव घेण्यात आला. सबंधित विभागांना प्रतिलिपी सादर करण्यात आले. कदाचित कागदोपत्री वनविकास महामंडळाला आमचा गाव आमचा जंगल देण्यात आला तर मोठे उद्रेक नाकारता येणार नाही, असे कृउबास संचालक डॉ. हरेन्द्र रहांगडाले, सरपंच अनीता नेवारे, उपसरपंच कृष्णकुमार रहांगडाले, सामाजिक कार्यकर्ता सदन चौधरी, द्वारकाप्रसाद रहांगडाले, योगेश रहांगडाले, शिवाजी रहांगडाले, हेमराज रहांगडाले व शेकडो गावकऱ्यांनी इशारा दिला. (वार्ताहर)