सिहोऱ्यात शिवसेनेचा रास्ता रोको

By Admin | Updated: July 31, 2016 00:17 IST2016-07-31T00:17:06+5:302016-07-31T00:17:06+5:30

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावरून भाजपने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. वीज पुरवठा करण्यासाठी विलंब केल्यामुळे पाण्याचा उपसा झाला नाही.

Stop the path of Shiv Sena in the Sahara | सिहोऱ्यात शिवसेनेचा रास्ता रोको

सिहोऱ्यात शिवसेनेचा रास्ता रोको

शिवसैनिक आक्रमक : सोंड्याटोला उपसा सिंचन योजनेच्या कायमस्वरूपी वीज जोडणी करा
चुल्हाड (सिहोरा) : सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पावरून भाजपने शेतकऱ्यांची दिशाभूल केली. वीज पुरवठा करण्यासाठी विलंब केल्यामुळे पाण्याचा उपसा झाला नाही. याठिकाणी कायमस्वरूपी वीजपुरवठा सुरू ठेवण्यात यावा, या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात शिवसैनिक व शेतकऱ्यांनी शनिवारला सिहोऱ्यात तुमसर-बपेरा राज्य मार्गावर रास्ता रोको व जेल भरो आंदोलन केले.
भाजप व स्थानिक पदाधिकारी वीज बिलाचे १५ लाख रूपये दिल्याचे सांगत आहेत. परंतु प्रत्यक्षात विदर्भ पाठबंधारे विकास महामंडळाने हा पैसा ३१ मार्च २०१७ पर्यंत शासनाला परत करण्याचे अटीवर उसनवारीचा आधार घेऊन दिला आहे. या आंदोलनकर्त्यांना पाटबंधारे विभागाचे कुकडे, बॅनर्जी, महातिवरणचे गडपायले, नायब शिंदे यांनी भेट घेतली. आंदोलनकर्त्यात चर्चा सुरू असताना शिवसैनिक सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा चांदपूर जलाशय पुर्णत: पाण्याने भरत नाही. तोपर्यंत वीज पुरवठा खंडीत केला जाणार नाही, अशी भूमिका घेऊन राजेंद्र पटले व अन्य शिवसैनिक व शेतकरी तुमसर बपेरा राज्य मार्गावर ठिय्या आंदोलन केले. परंतु संबंधित विभागाचे अधिकारी यांनी आश्वासन दिले नाही. यामुळे राज्यमार्गावर शिवसैनिकांनी जेलभरो केले. पोलिसांनी जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले, जिल्हा उपप्रमुख शेखर कोतपल्लीवार, कमलाकर निखाडे, भाष्कर भोयर, ओमेश्वर वासनिक, भोजराज तुरकर, योगराज टेंभरे, अमित मेश्राम, धनराज भगत, यादोराव तुरकर, जगदीश चौधरी, अंकुश पटले, कुंजीलाल पटले यांना अटक करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेंद्र शेटे व सहायक पोलीस निरीक्षक नागेश जायले यांनी बंदोबस्त तैनात केला होता. (वार्ताहर)

Web Title: Stop the path of Shiv Sena in the Sahara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.