आज नाकाडोंगरीत शिवसेनेचा रास्ता रोको
By Admin | Updated: June 14, 2017 00:14 IST2017-06-14T00:14:09+5:302017-06-14T00:14:09+5:30
नाकाडोंगरी तथा गोबरवाही परिसरातील अनेक समस्या मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत.

आज नाकाडोंगरीत शिवसेनेचा रास्ता रोको
एल्गार : अनेक वर्षांपासून समस्या जैसे थे
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नाकाडोंगरी तथा गोबरवाही परिसरातील अनेक समस्या मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत. शासन तथा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता शिवसेनेने उद्या दुपारी १.३० वाजता नाकाडोंगरी येथे रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, घरगुती गॅस सिलिंडर उपलब्ध करून देणे, गोबरवाही येथे सब डिलरशिप त्वरीत सुरु करणे, लाभार्थ्यांना एलपीजी गॅस कनेक्शन त्वरीत उपलब्ध करून देणे, पाणी बिलात अनावश्यक अवाढव्य वाढ रद्द करणे, पाथरी जोड रस्त्यापासून धुटेरा रस्त्याचे काम नियोजनात त्वरीत घेणे आदी मागण्यांचा समावेश आहे. आतापावेतो संबंधित विभागाच्या विभाग प्रमुखांना पत्रव्यवहार करून प्रत्यक्ष भेटी घेतल्या. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. संपूर्ण गावे जंगलव्याप्त असून शासनाच्या अनेक योजनांपासून येथील नागरिक वंचित आहेत.
शासन तथा प्रशासनाला शिवसेना स्टाईलने आंदोलन करून लक्ष वेधून घेण्याकरिता बुधवारला नाकाडोंगरी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले, प. स.चे उपसभापती शेखर कोतपल्लीवार, सुधाकर कारेमोरे, नरेश उचिबगले, अनिल द्रुगकर, डालाराम पुष्पतोडे, महेंद्र राऊत, सुनिल पारधी, पं.स. सदस्य जितेंद्र सरीयाम, संपत बांगरे करणार आहेत.