वैनगंगेचा नैसर्गिक प्रवाह रोखला

By Admin | Updated: April 30, 2016 00:34 IST2016-04-30T00:34:36+5:302016-04-30T00:34:36+5:30

भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी वैनगंगा नदीचा प्रवाह अडवून पाणी उपसा करणे सुरू आहे.

Stop the natural flow of Wainganga | वैनगंगेचा नैसर्गिक प्रवाह रोखला

वैनगंगेचा नैसर्गिक प्रवाह रोखला

देव्हाडा येथे पाण्याचा उपसा : पुढचा प्रवाह बंद, नदीपात्र कोरडे
मोहन भोयर तुमसर
भंडारा जिल्ह्याची जीवनदायिनी वैनगंगा नदीचा प्रवाह अडवून पाणी उपसा करणे सुरू आहे. प्रवाह रोखल्याने बाम्हणी-माडगी येथील नदीचे पात्र कोरडे पडले आहे. नदीचा प्रवाह थांबविणे हा गंभीर प्रकार मागील एक महिन्यापासून सुरू आहे. वाहनी-मांडणी येथील बॅरेजमुळे नदी पात्रातील प्रवाह हा अत्यल्प होता. आता प्रवाह रोखल्यामुळे नदीपात्रात पाणी वाहणे बंदच झाले आहे.
भंडारा -गोंदिया जिल्ह्यात प्रखर उष्णतेची लाट सुरू आहे. बारमाही वाहणारी वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडत चालले आहे. तुमसर-मोहाडी तालुक्यातून वैनगंगा नदी वाहते. मोहाडी तालुक्यातील देव्हाडा (बुज) येथे वैनगंगा नदीचा प्रवाह रोखण्यात आला आहे.
नदीपात्रात प्लॉस्टीक पोतीत वाळू भरण्यात आली. ही वाळूची पोती पाण्याच्या प्रवाहासमोर ठेऊन मोठी पाळ तयार करण्यात आली. पाणी रोखून या पाण्याचा प्रचंड उपसा करणे सध्या सुरु आहे. नदीपात्रात पाणी उपसण्यासाठी मोठ्या मोटारी लावण्यात आल्या आहेत. पाणी उपसा करता येते, पंरतु नदीपात्राचा नैसर्गिक प्रवाह विना परवानगीने रोखता येत नाही. तशी परवानगीसुध्दा प्रशासन देत नाही.
मागील एका महिन्यापूर्वी पाणी रोखण्यात आले अशी माहिती आहे. या स्थळाला प्रत्यक्ष भेट देऊन लोकमतने खातरजमा केली. तुमसर तालुक्यात व तिरोडा तालुक्याच्या सीमेत मांडवी-वाहनी वैनगंगा नदी प्रवाह रोखण्यात आला.

वैनगंगा नदीचा प्रवाह रोखल्याने पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मांडवी-वाहनी येथे वैनगंगा नदी पात्रात पाणीसाठा आहे. त्यामुळे कोरड्या नदीपात्रात बॅरेजमधून पाणी सोडण्यात यावे. ज्यामुळे पाणी टंचाईवर मात करता येईल. अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही.
- के. के. पंचबुध्दे,
जि.प. सदस्य मोहाडी

Web Title: Stop the natural flow of Wainganga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.