लाखांदूर तालुक्यातील डाटा आॅपरेटरांचे काम बंद आंदोलन

By Admin | Updated: January 23, 2015 01:07 IST2015-01-23T01:07:27+5:302015-01-23T01:07:27+5:30

शासनासोबत झालेल्या महाआॅनलाईनचा करार रद्द करावा, डाटा आॅपरेटरांना शासन सेवेत कायम करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी लाखांदूर तालुक्यातील ...

Stop movement of data operators in Lakhandur taluka | लाखांदूर तालुक्यातील डाटा आॅपरेटरांचे काम बंद आंदोलन

लाखांदूर तालुक्यातील डाटा आॅपरेटरांचे काम बंद आंदोलन

भंडारा : शासनासोबत झालेल्या महाआॅनलाईनचा करार रद्द करावा, डाटा आॅपरेटरांना शासन सेवेत कायम करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांसाठी लाखांदूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील डाटा आॅपरेटरांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारला आहे.
ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यासाठी संगणक परिचालकाची नेमणूक करण्यात आली. आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या लेखाजोख्याचे सर्वच प्रकारची कामे डाटा आॅपरेटर सेवाभावी वृत्तीने काम करीत आहे.
मात्र संगणक परिचालकाचा शासनाने निर्धारित केलेला मानधन आठ हजार रूपये आहे. प्रत्येक्षात पदवीधर नसलेल्या संगणक परिचालकांना तीन हजार ८०० रूपये व पदवीधारक असलेल्यांना चार हजार १०० रूपये दिले जाते. संग्राम कक्ष स्थापन केल्यानंतर संगणकाची देखभाल, दुरूस्ती, छपाई साहित्य कधीही वेळेत मिळाले नाहीत.
संगणक देखभाल दुरूस्तीवर लागणारा व अधिकचा छपाई साहित्यांचा खर्च नाहक ग्रामपंचायतीवर आहे. शासन निर्णयानुसार नियमित व वेळेवर कधीही मानधन दिले गेलेले नाही. मागणी केल्यास सेवेतून कमी करण्याच्या धमक्या देण्यात येत आहे. याकरीता महाआॅनलाईनचा करार रद्द करण्यात यावा, शासन सेवेत कायम करण्यात यावे, किमान मासिक वेतन १० हजार रूपये देण्यात यावे, शासनातर्फे दिले जाणारे सर्व लाभ द्यावे, मुळ मानधनातून मागील तीन वर्षाचा कपात केलेला मानधन देण्यात यावे, जिल्हा परिषद व पंचायत समिती लाखांदूर येथे वेळोवेळी होणाऱ्या सभांचा प्रवास भत्ता देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना शाखा लाखांदूर तालुकाच्या पदाधिकाऱ्यांची आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Stop movement of data operators in Lakhandur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.